Kolhapur Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmers : शेतकऱ्यांनी पेरण्यांवर दिला जोर, कृषी केंद्रांवर बियाण्यांच्या खरेदीसाठी झुंबड

Farmers Sowing : पेरण्यांना वेग आल्याने विविध कंपन्यांच्या बियाणे, तणनाशके, टॉनिक, कीटकनाशकासह रासायनिक खतांची मागणी वाढली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers Sowing : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा वळवाच्या पावसाने चांगली साथ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना वेग दिला आहे. याची खबरदारी म्हणून कृषी विभागाने खतांचा पुरवठा आणि बियाणांची मोठी तरतूद करून ठेवली आहे. दरम्यान मागच्या चार दिवसात झालेल्या पाऊस आणि हवामान विभागाने दिलेला मॉन्सूनच्या इशाऱ्याने शेतकरी पेरण्यांच्या नियोजनाकडे लागला आहे. यासाठी कृषी केंद्राबाहेर बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.

जिल्ह्यात यावर्षी एक लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. तसेच, विविध कंपन्यांच्या बियाणे, तणनाशके, टॉनिक, कीटकनाशकासह रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत पेरण्यांनी गती घेतली आहे. कागल, राधानगरी, करवीर तालुक्यातील पश्चिम भाग, गगनबावडा, शाहूवाडीसह हातकणंगले तालुक्यातील काही भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत.

हातपेरणीसह बैलजोडी आणि छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने जोडलेल्या कुरीला प्राधान्य दिले जात आहे. चांगले व दर्जेदार बियाणे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह आहे. ज्या उसाची आधीच भरणी झाली आहे किंवा भरणी केली आहे, त्या ऊस लागणीमध्ये तणनाशक फवारणीसाठी लगबग सुरू आहे.

सध्या तणनाशकांसह इतर कीटकनाशकांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, ज्या-ज्या ठिकाणी वळीव पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्याठिकाणी रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. चांगल्या आणि नामांकित कंपन्याच्या खताला प्राधान्याने मागणी आहे.

ज्यामध्ये नत्राचे प्रमाण चांगले आहे, असे खते खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. भांगलणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी तणनाशक फवारणीवर लक्ष देत आहेत.

कागल तालुक्यात पेरण्यांना जोर

गेल्या काही दिवसात कागल परिसरात चांगला व पोषक पाऊस झाला आहे. त्यामुळे खतांची मागणी वाढली आहे. खतांचा अपेक्षित साठा आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. तसेच तालुका कृषी विभागाकडून काटेकोर नियोजन करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे खते कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Drought Crisis: वगळलेल्या तालुक्यांचा दुसऱ्या यादीत समावेश; मुख्यमंत्री फडणवीस

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

SCROLL FOR NEXT