Jalna News : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी बॅंकाकडून कर्जदार १०२५ शेतकरी तर बिगर कर्जदार १ लाख ३ हजार ४४ असे १ लाख ४ हजार ६९ शेतकऱ्यांनी ५० हजार ७१९ हेक्टर क्षेत्राचा शेतकऱ्यांनी खरिप पिकांचा पीक विमा काढला होता.
त्यातच शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे विमा कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. तरीदेखील पीक विम्याची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नाही. त्यामुळे पीकविम्याची रक्कम कधी मिळणार, याकडे शेतकरी नजर लावून बसले आहेत.
मागील काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले. तरी पीकविमा काढला तरी तो शेतकऱ्यांचा फायद्याचे ठरतो. या वर्षीपासून पीक विम्याचा हप्ता शासनाकडून भरला जात आहे.
त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरीप पिक विमा काढण्यात आला. यात खरिप हंगामाकरीता बॅंकाकडून कर्जदार १०२५ शेतकरी तर बिगर कर्जदार एक लाख तीन हजार ४४ असे एकूण १ लाख ४ हजार ६९ शेतकऱ्यांनी ५० हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावर खरीप विमा भरला. परतु विमाचे पैस मिळतांना टाकण्यात आलेल्या अटींची पुर्तता करणे अवघड आहे.
यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा, जुलैत पाऊस, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड अशा प्रकारे तालुक्यात एकदंरीत हंगामात पावसाची उघडीप, सतत पाऊस, ढगाळ वातावरण, धुईचा परिणाम अशा अनेक संकटाना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम कापूस, सोयाबीन या पिकावर झाला.
त्यामुळे घनसावंगी, कुंभारपिंपळगाव, राजंणी, तीर्थपुरी, जांबसमर्थ, अंतरवाली टेंभी या मंडळात सोयाबीन पिकांसाठी तर राणीउंचेगाव मंडळात कापूस व सोयाबीन या पिकांच्या नुकसान पोटी रक्कम देण्याचे निर्णय झाला. त्यानुसार राज्य शासन व विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रीम शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली.
परंतू पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार केली, अशा शेतकऱ्यांच्या शेतात सर्वेक्षण करूनही या शेतकऱ्यांना पिक विम्याच्या पोटी देण्यात येणारा मोबादला अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही.
रब्बीच्या १ लाख ४७४ शेतकऱ्यांनी भरला विमा
रब्बी पिकांसाठी विमा काढण्यास नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली होती. तालुक्यात आतापर्यंत बॅंकेकडून ३६० कर्जदार शेतकरी तर १ लाख ११४ बिगर कर्जदार शेतकरी असे एकूण १ लाख ४७४ शेतकऱ्यांनी ६५ हजार ६८६ हेक्टर ६२ आर क्षेत्रांवर रब्बी पिक विमा काढला आहे. कृषी विभागाच्या वतीने पीक विमा काढण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली. आता ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
यंदा तालुक्यात झालेल्या नुकसानीचा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही, तो आधी मिळावा. नाही तर सरकारकडून एक रूपयांत विमा भरावा, नुकसानी भरपाई देण्यासाठी हात वर करायचे, असे धोरण असेल तर हा निव्वळ बनवाबनवीचा खेळ होईल.रंगनाथ बाजीराव पवार, शेतकरी, बोलेगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.