Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : कापसाचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

Cotton Rate : खानदेशात यंदा कमी पाऊस झाला. गुलाबी बोंडअळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी आहे.

Team Agrowon

Dhule News : खानदेशात यंदा कमी पाऊस झाला. गुलाबी बोंडअळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यात आणखी कमी दर व वित्तीय फटका कापूस विक्रीसंबंधी बसत असून, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याची स्थिती आहे.

कमी पाण्याने यंदा खरीप हंगाम हवा तसा आला नाही. केवळ २०-३० टक्के उत्पादन आले. कडधान्याचे पीक हवे तसे आलेच नाही. कापसाचे उत्पादन घटले आहे. दुष्काळी स्थिती तयार झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन कमी आले, पण कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. काही तालुक्यांत पाऊस बरा होता. तर काही भागात पाऊसमान कमी आहे. पूर्वहंगामी कापसाचे उत्पादन एकरी दोन, तीन ते चार क्विंटल एवढे हाती आले आहे.

कोरडवाहू कापसाचे उत्पादन एक क्विंटलपेक्षा कमी आहे. संक्रांतीनंतर दरात सुधारणा होते, असे शेतकरी मानतात. परंतु यंदा दर कमीच होत आहेत. जानेवारी महिना अर्धा संपला तरी कापसाचे दर सुधारलेले नाहीत.

प्रतिक्विंटल ६६००, ६६५० ते ६७००, ६८०० रुपये प्रतिक्विटलचा दर खेडा खरेदीत किंवा थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी वित्तीय अडचणीत आहेत. यामुळे मिळेल त्या दरात कापसाची विक्री सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT