Chhagan Bhujbal Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Compensation : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

Chhagan Bhujbal : अवकाळी पावसामुळे येवल्यासह जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

Team Agrowon

Yeola News : अवकाळी पावसामुळे येवल्यासह जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले. भुजबळ यांनी दिलेल्या पत्राचा आशय असा ः येवला तालुक्यासह जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, नाशिक तालुक्यांसह जिल्हाभरात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने रब्बीचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतातील गहू, कांदे, द्राक्षे, तूर, मका, कपाशी, हरभरा पिकांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याला अवकळीने पुन्हा अडचणीत आणले आहे. वातावरणीय बदलांमुळे ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

तसेच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या रोपांना व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा ओला झाला आहे, तर काढणीला आलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

गव्हाच्या ओंब्यांमध्ये बी तयार होत असताना पिकांचे नुकसान झाल्याने शेकडो हेक्टरवरील गहू हाताशी येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील शेतात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT