Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Subsidy : पीक नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित

Crop Damage Compensation : इसरवाडी फाटा (ता.गंगापूर) येथे शेंदूरवादा, तुर्काबादसह तालुक्यातील इतर महसुली मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही.

Team Agrowon

Shendurvada Agriculture News : इसरवाडी फाटा (ता.गंगापूर) येथे शेंदूरवादा, तुर्काबादसह तालुक्यातील इतर महसुली मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी अनुदान (Heavy Rain) मिळालेले नाही तसेच काही शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने टेंभापुरी धरण बचाव कृती समिती तर्फे सोमवारी (ता.१७) चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते.

मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

याबाबत पत्रही समितीतर्फे विविध विभागाला देण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान संदर्भात महसूल विभागाचे तहसीलदार सतीश सोनी व पीक विमा संदर्भात प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.

तसेच याबाबतचे पत्र तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, पेशकर डी. एस. राजपूत, विमा प्रतिनिधी यांनी दिल्याने सदरील लेखी आश्वासन घेऊन सदरील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी योगेश शेळके, विठ्ठल कुंजर, महेशभाई गुजर, धनंजय ढोले, विठ्ठल म्हस्के, बाळू इथापे, संतोष खवले, शांतिलाल साळवे यांच्यासह गणेश भावले, बद्री राऊत, गणेश शिंदे, शरद गवादे बद्रीनाथ ढोले, दिनकर ढोले, गणेश गुंजाळ, स्वप्नील खवले, दिगंबर ढोले आदींची उपस्थिती होती.

पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक संदीप शेवाळे, हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू सानप, प्रतापसिंग बहुरे यांनी बंदोबस्त ठेवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT