Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नुकसानीवर मलमपट्टी नको

Paddy Crop : गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Vikramgad News : गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फक्त पंचनाम्यांची मलमपट्टी नको. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भात हे एकमेव पीक आहे. या पिकावरच येथील ९० टक्के शेतकरी वर्षभराचा संसारगाडा चालवत आहेत. दोन वर्षांपासून परतीच्या व अवेळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावून घेतला होता. त्या वेळची नुकसान भरपाई अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

ज्या काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली, तीही अत्यंत तुटपुंजी होती, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यावर्षी नुसते परतीच्या पावसाचे नुकसान नाही, तर वादळी वाऱ्याने उभी पिके आडवी केली आहेत.

चार ते पाच दिवस पाण्यात आडवी झालेल्या भातपिकांच्या दाण्यांना कोंब फुटले आहेत. कापणी केलेले भात पाण्यात भिजल्याने काळे पडले आहेत. पेंढाही कुजल्याने त्याची विक्रीही होणार नाही व गुरेही खाणार नाहीत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.

दोन वर्षांपासून भात उत्पादक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसासह अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामे करून नुसती मलमपट्टी करण्यापेक्षा सरसकट भरपाई द्यावी. तरच शेतकरी या संकटातून बाहेर पडेल; अन्यथा काही दिवसांवर आलेली दिवाळी त्यांच्यासाठी काळी ठरेल.
- सुरेश पालवी, शेतकरी, कावळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT