Crop Damage Compensation : अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Farmers Waiting for Compensation : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Latur News : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. ३३ टक्क्यांच्या पुढे नुकसान झालेल्या पिके व फळांना सरकारने तातडीने भरपाई मंजूर केली.

जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवल्यानंतर अवघ्या चार दिवसांत सरकारने जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ७६७ शेतकऱ्यांना ३८४ कोटी १४ लाखाची भरपाई मंजूर केली. मंजुरीनंतर पंधरा दिवस झाले तरी ही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने लाडकी बहीण योजनेप्रमाणे भरपाईचा निधीही विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात सापडला की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

भरपाईचे वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईपोटी ३२६ शेतकऱ्यांना दोन कोटी एक लाख तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी तीन लाख ५८ हजार ७६७ शेतकऱ्यांना ३८४ कोटी १४ लाखाची भरपाई सरकारने ४ ऑक्टोबर रोजी मंजूर केली होती.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : अतिवृष्टीबाधितांसाठी ४१९ कोटी रुपयांवर निधी आवश्यक

पूर्वी भरपाईची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध व्हायची व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदारांना निधीचे वाटप केले जायचे. तहसीलदारांकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा केली जात होती. दोन वर्षांपासून भरपाईचे वाटप करण्यासाठी सरकारने ई-पंचनामा पोर्टल सुरू केले असून त्यावर याद्या अपलोड केल्यानंतर सरकारकडून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यात येते. भरपाई मंजूर होऊन पंधरा दिवस उलटले तरी ही रक्कम शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही.

लातूर तालुक्यातील २७ हजार ४३१ बाधित शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील अतिवृष्टीपोटी ४२ कोटी ७० लाख ८१ हजार रुपयांची भरपाई मंजूर आहे. आतापर्यंत ६५ टक्के शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून भरपाईची रक्कम जमा होईल.
सौदागर तांदळे, तहसीलदार, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com