Fertilizer Stock Update Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Compliant : पथकातील अधिकाऱ्यांकडूनच तक्रारदार शेतकऱ्यांची नावे उघड

Fertilizer Shortage : अहिल्यानगर तालुक्यातील एका गावांत असा प्रकार घडला, की युरिया खत मिळत नाही. उपलब्ध असूनही दुकानदार खत देत नसल्याबाबत काही शेतकऱ्यांनी खत मिळत नसल्याबाबत तालुका भरारी पथकातील एका अधिकाऱ्यांना सांगितले.

Team Agrowon

Ahilyanagar News : खत मिळत नसल्याची तक्रार एका शेतकऱ्याने भरारी पथकाकडे केली. मात्र एका अधिकाऱ्याने ज्या दुकानदाराबाबत तक्रार केली, तेथे जाऊन कारवाई तर केली नाहीच, उलट तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे गुप्त ठेवण्याऐवजी संबंधित दुकानदारांना दिल्याचा आरोप केला आहे.

हा प्रकार अहिल्यानगर तालुक्यात घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून खताबाबत दाखवली जात असलेली पारदर्शकता फोल ठरली. तक्रार करून खत मिळण्याऐवजी मानसिक त्रास होत असेल तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील एका गावांत असा प्रकार घडला, की युरिया खत मिळत नाही. उपलब्ध असूनही दुकानदार खत देत नसल्याबाबत काही शेतकऱ्यांनी खत मिळत नसल्याबाबत तालुका भरारी पथकातील एका अधिकाऱ्यांना सांगितले.

संबंधित अधिकारी लगेच तातडीने त्या दुकानदारांकडे गेले. मात्र तपासणी करून कारवाई होईल, संबंधित दुकानदारांकडे उपलब्ध असलेले खत मिळेल अशी आशा असताना कारवाई तर झाली नाहीच, उलट कोणी तक्रार केली ती नावे अधिकाऱ्याने दुकानदारांना सांगितली.

मुळात खत, बियाणे व अन्य निविष्ठांच्या तक्रारी असतील, शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल तर त्या सोडवण्यासाठी तसेच जादा दराने विक्री, खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना दिले नाही तर तपासणी करून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर भरारी पथके नियुक्त केली आहेत. शेतकऱ्यांनी या पथकाकडे तक्रार केली तर नावे गुप्त ठेवण्याचे सक्त आदेश आहेत.

जिल्ह्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने मागील काही दिवसांत जादा दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाया करून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यात मात्र तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची नावे संबंधित दुकानदारांना सांगितली. या प्रकाराने शेतकरी मात्र हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.

इतर खते घेतली तरच युरिया

अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. खताची लिंकिंग होणार नाही. झाल्यास तक्रार करा, नाव गुप्त ठेवून कारवाई करू, असे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात हा दावा फोल ठरत आहे. बहुतांश भागात युरिया खताची टंचाई आहे. जादा दराने विक्री होत असल्याच्या आणि युरिया पाहिजे असेल तर इतर खते घ्यावी लागतील अशी स्थानिक दुकानदार सक्ती करत असल्याच्या तक्रारी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review: संवेदनशील उद्योजकाची मूल्याधिष्ठित कर्तृत्वगाथा

Pigeaon Bird: पारव्यांचे नेमके करायचे काय?

Interview with Rajan Patil: सहकार परिषद कृतिशील होईल

Indigenous Cattle: ही ‘लक्ष्मी’ जपणार कोण?

Agriculture Pest Infestation: मूग, उडीद पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT