Fertilizer Scam: सटाण्यात खतांची लिंकिंग उघड

Farmer Rights: बागलाण तालुक्यात समाधानकारक पावसामुळे मका व इतर पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र यासाठी लागणारी रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपूर्वी ‘लिंकिंग’ सक्ती करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Fertilizer Scam
Fertilizer ScamAgrowon
Published on
Updated on

Nashik News: बागलाण तालुक्यात समाधानकारक पावसामुळे मका व इतर पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र यासाठी लागणारी रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपूर्वी ‘लिंकिंग’ सक्ती करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सटाणा येथील सचिन एजन्सीज या कृषी सेवा केंद्राचा परवाना नाशिक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने निलंबित केला आहे.

ही कारवाई खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत करण्यात आली.शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर बागूल यांनी स्वतः व्हिडिओ चित्रीकरण करून या गैरप्रकाराचा पुरावा दिला. त्यानंतर कृषी विभागाने तपासणी मोहीम राबवत संबंधित सेवा केंद्रावर कारवाई केली.

Fertilizer Scam
Fertilizer Scam : धामणगाव पाटला ३४ टन युरियाचा पकडला, गुन्हा दाखल

शहरातील सचिन एजन्सीज हे कृषी सेवा केंद्र दोषी आढळल्याने त्यांचा खत विक्री परवाना १४ जुलैपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. संबंधित विक्रेता यामध्ये लिंकिंग करण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. मात्र खते विक्री झाल्याचे बिलिंग झालेले नव्हते, असे समजते.

चौकशीत अनेक त्रुटी उघड

नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि बागलाण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संयुक्त चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालात त्रुटी नमूद करण्यात आल्या. यात रासायनिक खत साठवण व विक्रीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन साठा व भावफलक अद्ययावत नसणे, एन फॉर्म प्रमाणित नसणे, १९ एप्रिल २०२५ नंतर मासिक प्रगती अहवाल सादर न करणे, विक्री बिलांवर शेतकरी व वितरकाची स्वाक्षरी नसणे, युरिया व नॅनो युरिया एकत्र विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे.

Fertilizer Scam
Latur Fertilizers Scam: बेकायदा खतविक्री करणाऱ्या कंपनी प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा

शेतकरी संघटनेचा इशारा

या कारवाईनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.‘खत लिकिंग’ प्रकारावर आळा बसल्याचे दिसत असून, पुढे कोणत्याही कृषी सेवा केंद्राने लिकिंगची सक्ती केल्यास त्याच दुकानासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला आहे.

निलंबन कालावधीत वितरकाने कोणत्याही प्रकारची खते विक्री, खरेदी अथवा साठवणूक केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व कृषी सेवा केंद्रांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
- अभिमन्यू काशीद, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com