Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025 : पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे वेगाने सुरू

Kharif Sowing : महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मेमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मेमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला. मात्र, मागील आठवड्यापासून काही प्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्याच्या पूर्व व उत्तर भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे.

चालू वर्षीच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाळ्यापूर्वीच मॉन्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाल्याने दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, खेड, शिरूर, जुन्रर व आंबेगाव तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. सर्व पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले; परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी सावरू लागला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.

उन्हाळ्यात नांगरणी करून शेती तापायला ठेवली जाते. त्यामुळे पिके जोरदार येऊन उत्पादनात वाढ होते; परंतु यावर्षी उन्हाळ्यातच पाऊस पडल्याने जमीन तापायला वेळ मिळाला नाही. आता जमिनीत वाफसा आल्याने फणनी, कोळपणी व जमीन पिकासाठी तयार करण्यात येत आहे.

कृषी विभागाकडून खरिपाची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरवठा वेगाने करण्यात येत आहे. पावसामुळे खते व बियाणे वितरित करण्यामध्ये काही प्रमाणात अडथळे आले होते. परंतु आता कृषी विभागाने तातडीने पावले उचलत वेगाने हा पुरवठा करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार हा पुरवठा कृषी सेवा केंद्र चालकांना होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे मिळणार आहेत.

सोरतापवाडी येथील नंदकुमार चौधरी म्हणाले, की पूर्व हवेलीत उन्हाळ्यात यावर्षी विहिरी व बोअरवेल भरल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. आडसाली ऊस लावण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या वर्षी बाजरी, ऊस, मका, भुईमूग व फुलशेती वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT