PM Kusum Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांनो, खोट्या संदेशांपासून सावधान

Government Scheme : केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत ‘पीएम कुसुम योजना’ राबविली जात आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदान तत्त्वावर देण्यात येत आहेत.

Team Agrowon

Latur News : लातूर ः केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत ‘पीएम कुसुम योजना’ राबविली जात आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदान तत्त्वावर देण्यात येत आहेत.

त्यासाठी शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरावा लागतो. पण याचे खोटे संदेश पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार राज्यात घडत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा खोट्या संदेशांपासून सावध राहावे. असा संदेश आला तर ‘महाऊर्जा’कडे याची खात्री करूनच ऑनलाइन पैसे भरावेत, असे आवाहन ‘महाऊर्जा’चे लातूरचे विभागीय महाव्यवस्थापक समीर घोडके यांनी केले आहे.

‘पीएम कुसुम योजनेद्वारे तीन, पाच व साडेसात एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जात आहेत. राज्य शासनाने या योजनेसाठी एक लाख चार हजार ८२३ सौर कृषी पंपांसाठी मान्यता दिली आहे.

त्यानुसार महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास दहा टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. ही योजना राबविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.

त्याद्वारे अर्जापासून ते कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्याना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठवणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरण्याची शेतकऱ्याना मुभा देण्यात आली आहे. पण राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना खोटे संदेश पाठवून लाभार्थी हिस्सा भरून घेऊन फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT