Chhatrapati Sambhajinagar News: परिमंडलातील ४ लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत अडीचशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यात जवळपास २२ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. .छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील एकूण ४ लाख ६ हजार ८२१ ग्राहकांकडे २५० कोटी १० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. .Power Supply Disconnected: तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित.छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १ लाख ६ हजार २८८ ग्राहकांकडे ५२ कोटी ७४ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील १ लाख ७४ हजार ३२१ ग्राहकांकडे ५७ कोटी ४८ लाख व जालना मंडलातील १ लाख २६ हजार २१२ ग्राहकांकडे १३९ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे..Power Supply Disconnection: सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित.वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील शहर, ग्रामीण व जालना मंडलात महावितरणतर्फे धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत..फेब्रुवारी महिन्यात महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ४ हजार ८६१, ग्रामीण मंडलातील ८ हजार ८१३ व जालना मंडलातील ७ हजार ६८७ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यानंतरही ग्राहक अनधिकृतरीत्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.