Groundnut and Sesame Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Seed Scheme: भुईमूग-तीळ बियाणांसाठी अर्जाची मुदतवाढ – १३ तारखेपर्यंत संधी!

Last Date Extended for Summer Crop Seed Distribution : राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामासाठी भुईमूग व तीळ बियाण्यांचा मोफत पुरवठा केला जात आहे. बियाण्यांसाठी अर्ज करण्यास उद्यापर्यंत (ता.१३) मुदतवाढ देण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामासाठी भुईमूग व तीळ बियाण्यांचा मोफत पुरवठा केला जात आहे. बियाण्यांसाठी अर्ज करण्यास उद्यापर्यंत (ता.१३) मुदतवाढ देण्यात आली आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाच्या तेलबिया (एनएमईओ-ओएस) उपक्रमातून चालू २०२४-२५ पीक वर्षात उन्हाळी हंगामाकरिता बियाणे वाटले जाणार आहे. त्याकरिता महाडीबीटी प्रणालीत अर्ज स्वीकारले जात आहेत. राज्यात उन्हाळी भुईमूग व तीळ पिकांचे समूह तयार होण्याकरिता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण करतानाच शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा उपक्रमदेखील राबविले जाणार आहेत.

भुईमूग पिकासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहे. तसेच तीळ पिकाच्या समूहासाठी जळगाव, लातूर, बीड आणि बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीळ बियाणे वाटले जाईल.

यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम ‘महाडीबी’टीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे बियाणे, औषधे, खते अशी बाब दिसेल. त्याअंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमूग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करता येईल.

भुईमूग व तिळाचे समूह वाढविण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. तसेच, माहितीसाठी कृषी विभागाच्या कोणत्याही कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या विस्तार विभागाने केले आहे.

कृषी विभागाकडून यंदा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले भुईमूग बियाणे उच्चप्रतीचे आहे. यात तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाजारात या भुईमुगाला मागणी असते.
रफिक नाईकवाडी, संचालक, विस्तार व प्रशिक्षण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT