Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा निरुत्साह

Kharif Season : शेतकऱ्यांकडून योजनेला मिळालेला कमी प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

Team Agrowon

Solapur News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत (PMFBY) यंदा सरकारकडून करण्यात आलेले बदल, बंधनकारक करण्यात आलेले ॲग्रीस्टॅक आणि अधिसूचित पिकांतील विसंगतीमुळे शेतकऱ्यांचा या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसला.

त्यामुळेच ३१ जुलै अखेर यंदा जिल्ह्यातील केवळ २ लाख ४३ हजार १४२ शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या ३२.९३ टक्क्यांनी घटली आहे. शेतकऱ्यांकडून योजनेला मिळालेला कमी प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

मात्र, यानंतरही शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल का, याबाबत प्रशासन साशंक आहे. यंदा लागू करण्यात आलेल्या सुधारित योजनेत अनेक बदल झाले. त्यात पूर्वी एक रुपयात विमा हप्ता भरण्याची सवलत यंदा बंद करण्यात आली, त्यात खरिपासाठी संरक्षित रकमेच्या २ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के एवढा ठेवण्यात आला.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हंगामी परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान याप्रमाणे पूर्वी ठरवण्यात आलेले भरपाईचे ट्रिगर रद्द करण्यात आले. तसेच यंदा केवळ नुकसान भरपाई फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर देण्यात येणार आहे. ॲग्रीस्टॅक बंधनकारक करण्यात आले, पण याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही.

ठळक मुद्दे

गेल्या वर्षी जिल्ह्यात ७.३८ लाख अर्ज आले होते.

यंदा फक्त २.४३ लाख अर्ज झाले, त्यात बिगर कर्जदारांचे २.४३ लाख, तर कर्जदारांचे केवळ ३३ अर्ज.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या अंदाजे ८.९४ लाख, तर फक्त ५.५ लाख शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक घेतले.

अजूनही ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकसाठी नोंदणी नाही.

तालुकानिहाय अर्ज

बार्शी ७४,९३१

अक्कलकोट ५१,५३५

करमाळा २१,९५७

मंगळवेढा २२,०४८

सांगोला १७,३९६

उत्तर सोलापूर १२,१६०

दक्षिण सोलापूर १३,२६१

माळशिरस २,५२३

मोहोळ ७,११७

पंढरपूर फक्त ५८१

एकूण २ लाख ४३

हजार १४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture University : कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ वाऱ्यावर

Kharif Sowing : खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT