Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही ४२५ कोटींची ऊसबिले थकली

Sugarcane Payment : गाळप झालेल्या उसाचे दोन हजार ४९७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

Team Agrowon

Solapur News : साखर हंगाम संपून साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या दराप्रमाणे किंवा दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार एप्रिलअखेर शेतकऱ्यांची तब्बल ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अजूनही थकवली आहेत.

जिल्ह्यात यंदा ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यामध्ये एक कोटी चार लाख चार हजार ७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल साखर तयार झाली. गाळप झालेल्या उसाचे दोन हजार ४९७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी हंगाम सुरू होताना २७०० ते ३५०० रुपयांपर्यंत ऊसदर जाहीर केला होता.तथापि,बहुतांश कारखान्यांची प्रतिटन एफआरपी त्यांनी दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार किंवा जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी असल्याचे साखर आयुक्तालयाकडील अहवालावरून दिसते.

एफआरपी अहवालानुसार जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिल्याचे दिसते. अहवालानुसार १९ कारखान्यांकडे २१५ कोटी रुपये एफआरपी थकित असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र प्रत्यक्षात २७ कारखान्यांकडे त्यांनी जाहीर केलेल्या ऊसदराप्रमाणे ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अद्यापही थकित आहेत. केवळ सहा कारखान्यांनीच त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसबिले दिली आहेत.

आरआरसी कारवाईचा फार्स

राज्यात यावर्षी २० कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा समावेश आहे. मातोश्री, गोकूळ शुगर्स, लोकमंगल (बिबीदारफळ व भंडारकवठे), जयहिंद, संत दामाजी, सिद्धनाथ, इंद्रेश्‍वर, धाराशिव (सांगोला) या कारखान्यांवर मार्चमध्ये तर सहकार शिरोमणी, सिद्धेश्वर, आवताडे शुगर्स या कारखान्यांवर एप्रिलमध्ये आरआरसी झाली. पण ही कारवाई निव्वळ फार्स ठरल्याचे दिसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT