
Pune News : ‘‘दत्तात्रयनगर-पारगावतर्फे अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाला एफआरपीनुसार प्रथम आगाऊ (अॅडव्हान्स) दोन हजार ८०० रुपये प्रती टन अदा केली आहे. २८० रुपये प्रती टनाप्रमाणे एफआरपीनुसार उर्वरित रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार गाळप केलेल्या ११ लाख ३८ हजार ४९६ टन उसाला ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १० मे पर्यंत वर्ग करणार आहे,’’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
मंचर येथे रविवारी (ता.२७) झालेल्या पत्रकार परिषदेत बेंडे बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, संचालक बाळासाहेब घुले, दादाभाऊ पोखरकर, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाघचौरे उपस्थित होते.
श्री. बेंडे म्हणाले, की भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.२७) झालेल्या संचालक मंडळ बैठकीत एफआरपीनुसार उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झालेला आहे.
प्रथम अॅडव्हान्स जाहीर करताना हंगाम २०२४-२५ करिता अंदाजे १२ टक्के साखर उतारा घेऊन एफआरपी तीन हजार १०० रुपये टन ग्राह्य धरून दुसरा हप्ता ३०० रुपये टन देता येईल, असे जाहीर केले होते. तथापी उच्च न्यायालय व शासन निर्णयानुसार येत असलेल्या एफआरपी रकमेतून प्रथम अॅडव्हान्स दोन हजार ८०० रुपये टन वजा जाता २८० रुपये टन फरक येत आहे. यापूर्वी देखील प्रत्येक हंगामाची एफआरपी नुसार येणारी फरकाची रक्कम हंगाम संपल्यानंतर अदा केलेली आहे.
दृष्टीक्षेपात
२०२४-२५ गाळप हंगाम : १२ लाख ५२ हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन.
सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे सात कोटी ३३ लाख सहा हजार युनिट उत्पादन
कारखान्याचा वीज वापर वजा जाता तीन कोटी ६४ लाख ४५ हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात
९० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पामधून आजअखेर एक कोटी १९ लाख १० हजार बल्क लिटर रेक्टीफायर स्पिरीटचे उत्पादन.
९१ लाख १० हजार बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन.
डिस्टिलरी प्रकल्प सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.