Strawberry Nurseries Rain Damage agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

Strawberry Nurseries Satara : पावसाने सातारा परिसरातील स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान होत आहे. त्यातच भर म्हणून रोपांचे दरही पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

sandeep Shirguppe

Damage Strawberry Nurseries Rain : मागील आठवडाभर दिवसांपासून झालेल्या पावसाने सातारा परिसरातील स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान होत आहे. त्यातच भर म्हणून रोपांचे दरही पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. महाबळेश्वरमधील हुमगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

स्ट्रॉबेरी रोपांना यावर्षीदेखील चांगला दर राहील, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी भरपूर खर्च केला होता. मागचा काही काळ पावसाने विश्रांती दिल्याने पहिल्या टप्प्यातील अनेकांची रोपे नऊ ते दहा रुपयांपर्यंत विकली गेली. मात्र, आज पंधरा दिवसांतच रोपांचे दर निम्म्याहून खाली आले आहेत. त्यातच भर म्हणून सतत पडत असलेल्या संततधार पावसाने रोपांच्या लागणीही रखडल्या आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या, त्यांना मररोगाचा सामना करावा लागत आहे.

जावळी तालुक्यातील सनपाने यागावातील विजय दुर्गावळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्ट्रॉबेरी रोपांची परराज्यात विक्री करणाऱ्या स्थानिक एजंटांनी स्वतःच्या फायद्यासाठी रोपांचे दर पाडले आहेत. अशा प्रवृत्तींना शेतकऱ्यांनी संघटित होऊन उघडे पाडले तर त्याला आळा बसेल व सर्वच शेतकऱ्यांचा फायदा होईल असे म्हणाले.

लागवडी रखडल्या

दर वर्षी गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या लागवडी आता नवरात्रात तरी होतील की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन महिन्यांत लागवडीसाठी तयार होणारी रोपे चार महिने उलटूनही शेतातच पडली आहेत. ती बिकट हवामानात वाचवण्यासाठी आणखी खर्च करावा लागत आहे. हुमगाव परिसरातील रोपे हरियाना, पंजाब, दिल्ली या ठिकाणी जातात; पण तिथेही अद्याप पाऊस पडत असल्याने रोपांना मागणी कमी आहे.

स्ट्रॉबेरी हे पीक महाबळेश्वरची ओळख

स्ट्रॉबेरी हे पीक महाबळेश्वरची ओळख असली, तरी रोपांच्या निर्मितीसाठी वाई, जावळी व कोरेगाव तालुक्यांवर अवलंबून राहावे लागते. यंदाही महाबळेश्वर तालुक्यातील, तसेच अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या मातृवृक्षापासून रोपे तयार केली होती. मे व जून अशा दोन टप्प्यांत ही निर्मिती झाली. मात्र, यंदा सततच्या पावसाने, तसेच रोग किडींच्या प्रादुर्भावाने रोपे तयार करण्यात प्रचंड अडचणी आल्या. त्यातच मजुरांचीही मोठी टंचाई निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडून इतर तालुक्यातून मजूर आणण्याची वेळ आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT