Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi : विकसित महाराष्ट्राचा शेतकरी सर्वांत मजबूत स्तंभ : मोदी

Farmers is key to Maharashtra's growth: ‘‘महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे. भाजप महायुती आहे तर गती आणि प्रगती आहे. महायुतीसाठी शेतकरी अन्नदाता असून तो विकसित महाराष्ट्राचा सर्वांत मजबूत स्तंभ आहे,’’

Team Agrowon

Role of farmers in Maharashtra development: ‘‘महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे. भाजप महायुती आहे तर गती आणि प्रगती आहे. महायुतीसाठी शेतकरी अन्नदाता असून तो विकसित महाराष्ट्राचा सर्वांत मजबूत स्तंभ आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १४) आयोजित सभेत केले. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात गुरुवारी आयोजित महायुतीच्या ‘विजय निर्धार’ सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी अर्थराज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड, तसेच छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, ‘‘महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या कापसाला अधिकचा भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रात टेक्स्टाइल पार्क सुरू करून कापूस उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. सोयाबीन उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ५ हजारांची वेगळी मदत दिली. सोयाबीनचे किमान आधारभूत दर ६००० रुपये प्रतिक्विंटल करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिल आहे.

मराठवाड्यासारख्या भागात सर्वांत मोठा औद्योगिक पार्क निर्माण केला जातो आहे. त्यामुळे देश विदेशातील मोठ्या कंपन्या या ठिकाणी प्रकल्प उभे करतील. त्यातून मराठवाड्यातील युवकांना नवीन संधी व रोजगार निर्माण होईल.

एकीकडे महायुती प्रश्न सोडविण्याचे काम करत असताना ‘मविआ’ने राज्याचे प्रश्न वाढविण्याचे काम केले. छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यासाठी भाजप युतीच्या सरकारने १६०० कोटी रुपये दिले. ती योजना मविआच्या सरकारने थांबविली. अडीच वर्षे योजना थांबल्याने तिच्या खर्चात वाढ झाली. आता या योजनेसाठी केंद्र सरकार ७०० कोटी देत आहे.’’

पंचसूत्री नव्हे थापासूत्री : मुख्यमंत्री शिंदे

महाविकास आघाडीच्या सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेली पंचसूत्री नव्हे, तर ती थापासूत्री असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ‘‘मराठवाडा महायुतीचा बालेकिल्ला आहे.

नरेंद्र मोदी यांनी भगव्याचे रक्षण करण्याचे काम केले. त्यांनी महाराष्ट्राला भरभरून दिलेय. सरकारचे प्रमुख म्हणून आम्ही केंद्राकडे मदत मागायला जातो, त्यात कमीपणा नाही. महायुतीने सव्वादोन वर्षांच्या काळात कामांचा डोंगर उभा करत महाराष्ट्राला क्रमांक एकवर आणले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून विरोधकांना १४ वे रत्न दाखवा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Warehouse Construction : गोदाम उभारणीमध्ये वजन काटा महत्त्वाचा...

Climate Change Organizations : हवामान बदलात महिलांचीच होरपळ अधिक

Silk Farming : सर्वत्र विणले जावे रेशीम जाळे

Agricultural Electricity : सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू : अजित पवार

SCROLL FOR NEXT