PM Modi : महायुती सोयाबीनला ६ हजार हमीभाव देणार; पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

Maharashtra vidhan sabha election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथील चिमूर येथील जाहीर सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
PM Modi In Maharashtra vidhan sabha election
PM Modi In Maharashtra vidhan sabha electionAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१२) चंद्रपूर चिमूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोदी यांनी, देशातील शेतकऱ्याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असून सत्ता द्या, महायुतीने सोयाबीन शेतकऱ्यांना ६ हजार हमीभाव देण्याचे वचन दिल्याचे म्हटले आहे.

यावेळी मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार काम करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना किसान शेतकरी सन्मान योजना देत आहोत. आता महायुतीने देखील नमो शेतकरी योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना १२ हजार मिळत आहेत.

PM Modi In Maharashtra vidhan sabha election
Nana Patole : मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, काय झालं 'चाय पे चर्चा' वेळी दिलेल्या आश्वासनांचे? : नाना पटोले

राज्यातील सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याची निर्यात कमी केली आहे. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जादाचे ५ हजार रूपये देत आहोत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव देवू असेही वचन महायुतीने दिल्याचे मोदींनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे. त्यांनी आपल्या काळात जलयुक्त शिवारला ब्रेक लावला. महायुतीने ती परत सुरू केली. गेल्या काही वर्षीत निळवंडे धरण आणि कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पही पूर्णत्वाकडे जात आहे. चंद्रपूरचे बांबू जगभर प्रसिद्ध असून आमच्या सरकारने बांबूशी निगडीत इंग्रजांच्या काळातील नियम बदलले. ज्यामुळे आता बांबूची शेती करणे सोपी झाल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

PM Modi In Maharashtra vidhan sabha election
Amol Kolhe : "शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन"; अमोल कोल्हेंची भाजपर टीका

मोदींनी, महाराष्ट्राचा झपाट्याने विकास करणे हाच आमचा ध्यास असून तो मविआ करू शकत नाही. मविआच्या सरकराने विकासाला ब्रेक लावण्याचे काम केले. त्यात त्यांची पीएचडी आहे. गेल्या २.५ वर्षात मविआने मेट्रो ते वाधवान बंदर आणि समृद्धी महामार्गपर्यंसह इतर प्रकल्प थांबवण्याचे काम केले. त्यामुळे आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू असल्याचे लक्षात ठेवा, असेही मोदी म्हणाले.

महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होणारे राज्य असून येथे आमच्या सरकारने नवीन विमानतळ बांधली आहेत. आत्ताही नव्या विमानतळांची कामे सुरू आहेत. नव्या महामार्गांची कामे केली जात आहेत. सुमारे डझनभर वंदे भारत गाड्या धावत असून शंभर हून अधिक स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. अनेक रेल्वे मार्गांचा विस्तार केला जात असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जनतेला रक्तरंजित खेळ दिला. चंद्रपूरच्या या भागानेही अनेक दशकांपासून नक्षलवादाचा सामना केला आहे. नक्षलवादाच्या या दुष्टचक्रामुळे येथील अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हिंसाचाराचा रक्तरंजित खेळ असाच सुरूच राहिला तर विकास होणार नाही, असे म्हटले आहे. आमच्या सरकारने नक्षलवादाला आळा घातल्याने आज चिमूर आणि गडचिरोलीचा परिसर मोकळा श्वास घेत आहे, असा दावा मोदींनी केला आहे. तसेच येथे नव्या संधी निर्माण होत असून या भागात पुन्हा नक्षलवाद वाढू यासाठी मविआला हद्दपार करा, असे आवाहन मोदी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com