Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issues : शेतकरी उपाशी; व्यापारी, विक्रेते मात्र तुपाशी

Agriculture Market Update : ग्राहक शेतीमाल खरेदी करताना जी किंमत देतो त्यापैकी खूपच कमी पैसा शेतकऱ्यांना, तर व्यापारी आणि विक्रेत्यांना जास्त मिळतो. भाजीपाला आणि फळे उत्पादकांची तर परिस्थिती चिंताजनक आहे.

Anil Jadhao 

Pune News : ग्राहक शेतीमाल खरेदी करताना जी किंमत देतो त्यापैकी खूपच कमी पैसा शेतकऱ्यांना, तर व्यापारी आणि विक्रेत्यांना जास्त मिळतो. भाजीपाला आणि फळे उत्पादकांची तर परिस्थिती चिंताजनक आहे. ग्राहक देत असलेल्या किमतीपैकी कांदा उत्पादकांना केवळ ३६ टक्के पैसा मिळतो तर उरलेला ६४ टक्के पैसा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो. द्राक्ष उत्पादकांना ग्राहकाने दिलेल्या किमतीपैकी ३५ टक्के, टोमॅटो उत्पादकांना केवळ ३३ टक्के आणि केळी उत्पादकांच्या हाती फक्त ३० टक्के पैसा येतो, असे ‘आरबीआय’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

टोमॅटोचे शेतकऱ्यांना ३३.५ टक्के, व्यापारी, विक्रेत्यांना ६६.५ टक्के

ग्राहकांनी बाजारात टोमॅटो खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी जी किंमत दिली त्यापैकी खूपच कमी पैसा शेतकऱ्यांच्या हाती येतो. शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत टोमॅटो पोचेपर्यंच्या मूल्य साखळीत अनेकजण काम करत असतात. शेतकऱ्यांपेक्षा त्यांनाच जास्त पैसा मिळतो. बाजारात ग्राहकाने टोमॅटोला जी किंमत दिली त्यापैकी शेतकऱ्याला केवळ ३३.५ टक्के पैसा मिळतो. उरलेले व्यापारी आणि विक्रेते घेतात.

ग्राहकाने दिलेल्या किमतीत कुणाला किती पैसा मिळतो

शेतकरी…३३.५ टक्के

व्यापारी…२१.३ टक्के

घाऊक विक्रेते…१६.१ टक्के

किरकोळ विक्रेते…२९.१ टक्के

कडधान्य उत्पादकांना किमतीचा जास्त हिस्सा

आरबीआयच्या या संशोधन अहवालात असे म्हटले आहे, की ग्राहकाने शेतीमाल खेरदी करताना दिलेल्या किमतीतील हिस्सा कडधान्य उत्पादकांना इतर पिकांच्या तुलनेत जास्त मिळतो. तसेच हरभऱ्याच्या मूल्यसाखळीत ग्राहकाने दिलेल्या किमतीत सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के पैसा शेतकऱ्याला मिळतो. तर उरलेले २५ टक्के व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतात. तुरीच्या किमतीतील मात्र ६५ टक्के शेतकऱ्याला मिळतात आणि उरलेले ३५ टक्के पैसे व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतात. मुगासाठी ग्राहकाने दिलेल्या किमतीपैकी ७० टक्के शेतकऱ्यांना, तर ३० टक्के व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतात.

केळी उत्पादकांपर्यंत केवळ ३० टक्के पैसा

ग्राहक बाजारात केळी खरेदी करताना जी किंमत देतो त्या किमतीपैकी शेतकऱ्यांना केवळ ३०.८ टक्के मिळतात. विशेष म्हणजे ग्राहक देत असलेल्या किमतीपैकी सर्वाधिक कमी पैसा केळी उत्पादकांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले. उरलेला सर्व पैसा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो.

कुणाला किती पैसा मिळतो?

शेतकरी…३०.८ टक्के

व्यापारी…२६.९ टक्के

घाऊक विक्रेते…१९.२ टक्के

किरकोळ विक्रेते…२३.१ टक्के

द्राक्षाच्या ग्राहक किमतीचे

फक्त ३५ टक्के शेतकऱ्यांना

द्राक्ष उत्पादकांनाही बाजारातील किमतीचा खूपच कमी हिस्सा मिळतो. आरबीआयच्या अहवालात स्पष्ट झाले, की ग्राहक बाजारात द्राक्ष खरेदी करताना जेवढी किंमत देतो त्यापैकी केवळ ३५.७ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना मिळतो. उरलेला पैसा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो.

कुणाला किती पैसा मिळतो

शेतकरी…३५.७ टक्के

व्यापारी…२६.२ टक्के

घाऊक विक्रेते…२५ टक्के

किरकोळ विक्रेते…१३.१ टक्के

सुचविलेले उपाय

भाजीपाला आणि फळे नाशवंत असल्याने खासगी बाजार समित्यांमुळे व्यापारात पारदर्शकता वाढीस मदत होईल.

स्पर्धा वाढल्यास स्थानिक बाजार समित्यांमधील सुविधा विकास होण्यासही मदत होईल.

प्रक्रियादारांनी थेट बांधावर खेरदी केल्यास वाहतूक खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल.

थेट खरेदी केल्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होऊन वाहतूक खर्च वाचेल. याचा फायदा शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रियादारांना होऊ शकतो.

गावपातळीवर छोट्या दालमिल उभारल्यास प्रक्रियेचा खर्च वाचेल.

कडधान्याची खरेदी वाढविण्याची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT