Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Soybean Farmer Issue : सोयाबीनचे दर वाढतील या अशाने मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी यंदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे चांगलेच धास्तावले आहेत.
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

Nanded News : सोयाबीनचे दर वाढतील या अशाने मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी यंदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे चांगलेच धास्तावले आहेत. सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू केल्यानंतर दराला आधार मिळाला नसल्याने ही योजनाही कुचकामी ठरली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना मागील दोन वर्षांपासून दरात सुधारणा दिसत नाही. या दोन वर्षांत लागवड खर्चात मात्र दुपटीने वाढ झाली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे नवे सोयाबीन बाजारात आल्यानंतर दरात मोठी घसरण सुरू आहे. महिन्याखाली साडेचार हजार रुपये क्विंटलप्रमाणे मिळणारा दर सध्या चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीबाबत सावध भूमिका घेतली आहे.

Soybean
Soybean Market: सोयाबीनच्या भावात नरमाई

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे सोयाबीन केंद्राच्या हमीदराने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात १७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु आजपर्यंत एकाही खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही.

Soybean
Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

केंद्रचालक सोयाबीनमध्ये ओलाव्याचे कारण देत खरेदी केंद्र चालकांनी केवळ नोंदणीवर भर देत खरेदी होल्ड केली आहे. दरम्यान, शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाल्यावर दरात सुधारणा होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु हमीभाव खरेदी योजना याकामी कुचकामी ठरली आहे.

सध्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सोयाबीनला कमाल ४२५०, किमान ३५०० तर सरासरी ४१६५ रुपये दर मिळत आहे. तसेच खेडा खरेदीतही शेतकऱ्यांना सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपये दर मिळत आहेत. यासोबतच नांदेड जिल्ह्यातील कीर्ती, कोहिनूर, साईस्मरण, श्री कॅटल, सिद्धरामेश्‍वरा, एकदंत या ऑइल मीलवर सोयाबीनची खरेदी चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये दराने खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरेदीदारांकडून चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दर मिळत आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन विक्री थांबविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com