Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : ते आले, त्यांनी पाहिले अन् निघून गेले... ; दादा भुसेंच्या नुकसान पाहणी दौऱ्यानंतर शेतकरी संतप्त

Crop Damage : नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकेचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली.

Swapnil Shinde

Nashik News : राज्यात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा उद्धवस्थ झाल्या आहेत. कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली. तसेच प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.

द्राक्ष उत्पादक शेतकरी महिलेचे आश्रु अनावर झाले. या पावसाने सर्व होत्याचं नव्हतं करून ठेवलंय, आता सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं? कोण समजून घेणार, मंत्री आले आणि बांधावरूनच निघून गेले, अशी व्यथा सांगितली.

नाशिकमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त अनावर झाला. त्यांनी तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करा, अशी मागणी केली.

भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कृषी विभागाला नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील चांदवड, निफाड भागात कांदा आणि द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले. द्राक्ष बाग मणी भरण्याच्या अवस्थेत असतानाच अवकाळीचा तडाका बसला आहे. तसेच आदिवासी भागात देखील कापणीला आलेले भात पीक आणि काढून ठेवलेले भात पीक याचे नुकसान झाले.त्याचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्राप्त झाल्यावर शासनाला कळवला जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत 1800118485 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. तसेच ज्या ठिकाणी नेटवर्क अडचण आहे, त्यांनी लेखी स्वरूपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Farmer Suicide : चिंतन शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

SCROLL FOR NEXT