Team Agrowon
वातारणातील बदल (Climate Change) आणि बदलेलेल निसर्गचक्र यामुळे अवेळी पाऊस पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात अवकाळी (Unseasonal Rain) तसेच गारपिटीचा (Hailstorm) पाऊस पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
यावर्षी मार्च महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस हा गेल्या आठ वर्षाातील सर्वाधिक असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) म्हटले आहे. याशिवाय राज्यातही सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे.
राज्यात मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात ४ ते ८ मार्च आणि १५ ते १९ मार्च असा दोन टप्प्यात अवकाळीचा पाऊस झाला. मार्च वगळता जिल्ह्यात एकदाही अवकाळीच्या सरी बरसल्या नाहीत. दोन टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले.
हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३८.६ मिमी पावासाची नोंद झाली आहे. वेधशाळेतील नोंदी केवळ नाशिक शहरापुरत्या मर्यादित आहेत. तर, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या कालावधित ग्रामीण भागात सरासरी ३६.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
आयएमडीच्या अधिकांऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या २००० नंतरच्या रेकॉर्डनुसार २०१५ मध्ये सर्वाधिक ५०.६ मिमी पाऊस झाला आहे. तर २००९ आणि २०१४ या वर्षात १६.३ मिमी पाऊस झाला.