Rajaram Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sugar Factory : राजाराम कारखान्यात ऊस तोडीवरून गोंधळ, शेतकऱ्यांनी संचालकांना धरलं धारेवर

Rajaram Sakhar : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांनी विरोध केला, त्यांचा ऊस जाणीवपूर्वक नेत नसल्याचा आरोप करण्यात आला.

sandeep Shirguppe

Kolhapur Rajararam Sakhar : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांनी विरोध केला, त्यांचा ऊस जाणीवपूर्वक नेत नसल्याचा आरोप करत बावडा, शिये परिसरातील शेतकऱ्यांनी आज कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी व श्री. चिटणीस यांच्यात जोरदावर शाब्दिक चकमक उडाली. याप्रसंगी संचालक दिलीप उलपे उपस्थित होते. आठ दिवसांत तोडणीत सुधारणा न झाल्यास कारखान्याची वाहने अडवण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.

'राजाराम'चा हंगाम सुरू होऊन महिना झाला, पण अजून तोडणी यंत्रणा विस्कळीतच आहे. ज्यांच्या उसाच्या तोडीच्या तारखा आहेत, त्यांना तोड दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. कारखानाविरोधी गटाच्या शेतकऱ्यांचा ऊस जाणूनबुजून तोडत नाही. ६ ऑगस्टची लावण असूनही अद्याप तोड आलेली नाही. कारखान्याकडून आलेल्या यादीनुसारच तोडी दिल्या जातात, असा आरोप या शेतकऱ्यांनी यावेळी केला.

कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी ऊस नोंद वाढवली पाहिजे, उतारा वाढला पाहिजे, असे शेतकऱ्यांनी सांगितले जाते. पण प्रत्यक्षात त्या विरोधात तुम्ही काम करत आहात. तुम्हाला कारखाना तीन लाख टन गाळपावर बंद करायचा आहे का? तुम्हाला आमचा ऊस नको असेल तर तसे लिहून द्या, आम्ही इतरत्र उसाची विल्हेवाट लावतो, आदी प्रश्नांचा भडीमार करत चिटणीस यांना धारेवर धरले.

यावर कार्यकारी संचालक चिटणीस यांनी केलेल्या खुलाशावर शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात या तोडणी कार्यक्रमात सुधारणा न झाल्यास कारखाना बंद पाडला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

शिष्टमंडळात बाजीराव पाटील (शिये), दिगंबर मेडशिंगे (कांडगाव), दिनकर पाटील (वाशी), प्रमोद जाधव (खोची), दिलीप पाटील (टोप), रघुनाथ चव्हाण (कांडगाव,) मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, मिलिंद पाटील, प्रशांत पाटील (कसबा बावडा), दगडू चौगले (धामोड), बळवंत गायकवाड (आळवे) आदींचा समावेश होता.

आरोपात तथ्य नाहीः उलपे, चिटणीस

'कारखान्याकडे यंदाच्या हंगामात पुरेशी तोडणी यंत्रणा आली होती; पण शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कारखाना सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे ४० टक्के यंत्रणा परत गेली. त्यातच दोनवेळा पाऊस झाला. त्यामुळे तोडणी वेळापत्रक विस्कळीत झाले. जाणूनबुजून ऊस तोडला नाही, या आरोपात काहीही तथ्य नाही', असा खुलासा संचालक दिलीप उलपे व कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Farming: खानदेशात गहू पीक पेरणी सुरूच

Ravikant Tupkar: उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा: रविकांत तुपकर

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत किंचित वाढली रब्बी पेरणीची गती

New Pathways: नव्या वाटा-मार्गांवर चालूया...

Interview with Adv Sandip Paygude: कृषी विद्यापीठाची इंचभरही जमीन बळकावता येणार नाही

SCROLL FOR NEXT