Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सातपुड्यातील शेतकरी पुत्र देत आहेत सेंद्रीय शेतीचा संदेश

Natural farming : या शेती पद्धतीच्या अभ्यासक्रमात रोजगाराच्या असंख्य संधी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

 गोपाल हागे

Akola News : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पाच शेतकरी पुत्र सेंद्रीय शेती, पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सालईबन (जि. बुलडाणा) ते केरळ अशा ‘किसान संवाद यात्रे’वर निघाले आहेत. सोमवारी (ता. १८) या यात्रेकरूंनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात भेट देऊन सेंद्रीय शेती विभागात अधिकारी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना या यात्रेचा उद्देश सांगितला.

केरळमध्ये अलुवा येथे २८ ते ३० डिसेंबर या काळात राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रताप मारोडे, पद्मजा मारोडे, मंजितसिंग शिख, गजानन खेडकर आणि देवाशिष उमाळे असे पाच जण दुचाकीने निघाले आहेत.

या प्रवासात मार्गात लागणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना भेटणे, सेंद्रिय शेतीमध्ये काम करणाऱ्या संस्था, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या कामाचे शक्य तसे डॉक्युमेंटेशन ते करणार आहेत. विविध शाळा, कॉलेज आणि गावांमध्ये ते देशी बियाणे, मातीचे आरोग्य आणि सेंद्रिय शेतीबाबत संवाद सुद्धा साधणार आहेत.

यात्रेला सालईबन (ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा) येथून सोमवारी (ता.१८) सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रीय विभागाला भेट दिली.

या ठिकाणी विभागप्रमुख तथा मुख्य शास्त्रज्ञ सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे डॉ. आदिनाथ पसलावार यांनी सेंद्रीय शेतीसंदर्भात विद्यापीठात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. देशात पहिला अभ्यासक्रम या ठिकाणी तयार झाला असून ऑफलाइन पद्धतीने शिकवला जात आहे.

या ठिकाणी विद्यार्थी सेंद्रीय शेतीचा अभ्यासक्रम तसेच प्रात्यक्षिकही करीत आहेत. या शेती पद्धतीच्या अभ्यासक्रमात रोजगाराच्या असंख्य संधी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी ते करीत असलेल्या संशोधनाची, प्रयोगांची माहिती दिली. या वेळी समन्वयक आंतरराष्‍ट्रीय कार्यक्रम तथा सहायक प्रा. डॉ. नितीन कोंडे, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. परीक्षित शिंगरूप, प्रशांत गावंडे, संजय राजनकर आदी उपस्थित होते.

आजच्या काळात सेंद्रीय शेतीचे महत्त्व पुन्हा एकदा वाढू लागले. या शेती पद्धतीचा विस्तार व्हावा, पर्यावरण संरक्षण साधता यावे या उद्देशाने या क्षेत्रात चाललेल्या कामाचे डॉक्युमेटेंशन करण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वजण सालईबन ते केरळ असा प्रवास करीत आहोत. या दरम्यान शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत.
- प्रताप मारोडे, सहभागी शेतकरी पुत्र, किसान संवाद यात्रा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार

Maize Ethanol Project: महाराष्ट्रात उभारणार मका पीक आधारित नवा इथेनॉल प्रकल्प, राज्य सरकारकडून ११५ कोटी निधीला मुंजरी

Cotton Farming Guidance: कोंढवड येथे कापूस उत्पादकांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT