The Glory of Women Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment: मंचरला शेतकरी महिलांचा गौरव

Vasantrao Naik Jayanti: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंचर (पुणे) येथे रसायनमुक्त शेती, देशी वाणांचे संवर्धन आणि टिकाऊ शेतीसाठी कार्य करणाऱ्या आठ शेतकरी महिलांचा गौरव करण्यात आला.

Team Agrowon

Manchar News : हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंचर येथे देशी वाण लागवड, संवर्धन व रसायनमुक्त शेती या उपक्रमासाठी आठ शेतकरी महिलांचा गौरव करण्यात आला.

शरद बँकेच्या दत्तात्रय वळसे पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले. आंबेगाव पंचायत समिती, कृषी विभाग, बाजार समिती, वन व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी ज्ञानशक्ती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे-पाटील, गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, बाजार समितीचे सभापती नीलेश (स्वामी) थोरात, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, रंजना शेटे,

रागिणी बोराडे, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी सलमान शेख, मनीषा गावडे, रोहित थोरात, अपेक्षा वाघुले यांची मनोगते झाली. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

सन्मानित शेतकरी महिला

दीपाली अभंग (अवसरी खुर्द), अश्विनी उभे (दांगटवाडी), जयश्री धुमाळ (पेठ), सुनंदा चासकर (लांडेवाडी), वनश्री वाळुंज (जवळे), मनीषा गावडे (गावडेवाडी), मळगंगा महिला बचत गट, भैरवनाथ महिला बचत गट (पारगावतर्फे खेड) .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat in Summer: उन्हामुळे गव्हाचा दाणा बारीक? तातडीने करायच्या ३ उपाययोजना

Veterinary Doctors Protest: पशुवैद्यक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; १० मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

Children Nutrition: उत्पादनाबरोबर दुधाचे सेवनही वाढवा

War impact on farmers : युद्धामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का; नाना पटोलेंचा सभागृहात सवाल, मंत्री राणेंचं उत्तर

Farm Roads On 7/12: राज्यातील पाणंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद होणार; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

SCROLL FOR NEXT