Women Empowerment: महिला होणार आत्मनिर्भर; महिला पतसंस्थांद्वारे क्रांती

Ladki Bahin Scheme: राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक भक्कम पाऊल उचलण्यात आले आहे.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Buldhana News: राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक भक्कम पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, याद्वारे जिल्ह्यात महिलांच्या आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

या पतसंस्था महिला सभासदांच्या सहभागातून स्थापन केल्या जातील. शहरी भागात किमान ५०० महिला व ५ लाखांचे भांडवल, तर ग्रामीण भागात २५० महिला व १.५ लाखांचे भांडवल आवश्यक आहे. जिल्हास्तरावर १५०० महिला सभासद व १० लाखांचे भांडवल असणे गरजेचे आहे.

Women Empowerment
Women Empowerment : महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे ः शरद पवार

महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून या संस्थांची अंमलबजावणी होणार आहे. पात्र महिलांची यादी महिला व बालविकास विभाग तयार करेल, त्यानंतरच संस्थांची नोंदणी होईल.

Women Empowerment
Women Empowerment : नाबार्ड सहलीतून महिलांच्या शेतीविषयक ज्ञानात भर

लाडकी बहीण’ योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व व निर्णयक्षमतेचा विकास करण्याचे साधन ठरणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सांगितले. तर सहायक निबंधक ए. बी. इंगळे यांनी नोंदणीची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाईल, असे स्पष्ट केले. या योजनेतून महिलांना उद्योग,

व्यवसाय विकासासाठी आवश्यक निधी सहज उपलब्ध होणार असून स्थानिक पातळीवर महिला उद्योजकतेला मोठा हातभार लागणार आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील महिलांचा आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com