Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Private Money Lending : सावकाराकडील शेत न मिळाल्यास आत्मदहनाचा शेतकऱ्याचा इशारा

Agriculture Land : महागाव तालुक्यातील आमनी येथील शेतकरी प्रल्हाद कदम व त्यांच्या बंधूंची १६ एकर शेतजमीन महागाव येथील बेकायदा सावकारी करणाऱ्यांनी बळकावली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : महागाव तालुक्यातील आमनी येथील शेतकरी प्रल्हाद कदम व त्यांच्या बंधूंची १६ एकर शेतजमीन महागाव येथील बेकायदा सावकारी करणाऱ्यांनी बळकावली आहे.

या प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होऊनही शेतजमीन नावावर करून दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी प्रल्हाद कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

शेतकरी प्रल्हाद कदम यांची सावकारांनी बळकावलेली सोळा एकर शेतजमीन परत मूळमालक कदम बंधूंच्या नावे करावी, असा निकाल महानिबंधकांनी दिला आहे. त्यानंतरही महसूल अधिकाऱ्यांनी कदम बंधूंना शेतजमीन मिळून दिलेली नाही.

महसुली नोंद घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना महागाव भेटीत शेतकऱ्यांनी निवेदन दिले. सावकाराच्या आर्थिक आमिषाला बळी पडून संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर कदम बंधूंनी महागाव तहसीलदारांना निवेदन पाठविले. या निवेदनात २३ डिसेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे प्रा. घनश्याम दरणे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Coriander Intercropping: उसातील कोथिंबिरीची नियोजनबद्ध शेती

Smart Farming: ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान त्रिसूत्रीचा आदर्श : विक्रम गायकवाड

Women Farmers Empowerment Bill: कागदी ओळख की हक्कांची लढाई?

Onion Procurement Irregularities: सडके कांदे दूर करा

Onion Procurement Irregularities: केंद्राच्या कांदा खरेदीत अधिकारी-दलालांच्या संगनमताचा आरोप

SCROLL FOR NEXT