Capsicum Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Farming : ढोबळी मिरची रोपाला सहाव्या दिवशीच कळी

Capsicum Seedling : येथील एका शेतकऱ्याची ढोबळी मिरचीच्या रोपांमध्ये फसवणूक झाली असून, निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने पंचायत समितीकडे तक्रार केली आहे.

Team Agrowon

Satara News : येथील एका शेतकऱ्याची ढोबळी मिरचीच्या रोपांमध्ये फसवणूक झाली असून, निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित रोपवाटिकेवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान, तक्रारीनंतर कृषी विभाग व तज्ज्ञांकडून पिकाची पाहणी करण्यात आली आहे.

औंध येथील शेतकरी जयवंत जगदाळे यांनी तीन महिन्यांपूर्वी सिद्धेवाडी खण येथील एका खासगी रोपवाटिकेतून एकूण ४८ हजार रोपे घेतली होती. याची लागवड त्यांनी २५ व २६ डिसेंबरला केल्यानंतर त्यांना तीस दिवसांत कळी लागणे अपेक्षित होते; परंतु रोपाला सहाव्या दिवशी कळी लागली.

याची माहिती संबंधित रोपवाटिकेच्या मालकांना दिली असता त्यांनी तिसाव्या दिवशी तुमच्या प्लॉटमधून उत्पन्न सुरू होईल, असे सांगितले. हा प्रकार शंकास्पद वाटल्याने श्री. जगदाळे यांनी रोपवाटिकेच्या संबंधित मालकांना प्लॉटला भेट देण्यासाठी वारंवार विनंती केली; परंतु त्यांनी टाळाटाळ केली. सद्यःस्थितीत रोपांची ७६ दिवस वाढ झाली नसून रोपवाटिकेने निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

ढोबळी मिरचीच्या ७६ दिवसांच्या लागणीमध्ये खत, मजुरी, औषध फवारणी असे एकूण सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, तर रोपांची गुणवत्ता चांगली असती तर एकरी ३० लाख रुपयेप्रमाणे पाच एकरांचे दीड कोटी रुपये उत्पन्न निघाले असते. या वेळी सद्यःस्थितीत शेतकऱ्याचे अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तपासणी अहवाल शास्त्रज्ञांकडे पाठविला

याप्रकरणी श्री. जगदाळे यांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर सातारा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश देशमुख, गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, तालुका कृषी अधिकारी विक्रम भागमोडे, तंत्र अधिकारी सागर डांगे आदी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याच्या प्लॉटला भेट देऊन पाहणी केली, तसेच तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शास्त्रज्ञांकडे पाठविण्यात आला आहे.

शेतकरी महागडे बियाणे, खते वापरून मेहनत घेऊन लाखो रुपये खर्च करून पीक जोपासत आहेत. उत्पादनाची अपेक्षा ठेवून नंतर तेच पीक वांजोटे निपजायचे, अशी स्थिती आहे. बोगस कंपन्यांच्या बियाण्यांमुळे व फसव्या रोपवाटिकेमुळे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे एकरी २५ ते ३० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
- जयवंत जगदाळे, शेतकरी, औंध.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT