Sugarcane Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : पणदरेचे संजय जगताप ठरले काळ्या मातीतले नायक

Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात.

कल्याण पाचांगणे ः सकाळ वृत्तसेवा

Baramati News : माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. यंदा सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादनाची स्पर्धा चालू आहे. माळेगावचे सभासद आणि पणदरे-सोनकसवाडीचे शेतकरी संजय यशवंत जगताप यांनी चालू हंगामात एकरी १३७ टनाचे उत्पन्न घेतले आहे.

त्यांनी या अगोदरचे शंभर टनांचा विक्रम मोडला आहे, अशी माहिती कारखान्याच्या ऊस विकास विभागाने दिली. परिणामी काळ्या मातीतले नायक म्हणून जगताप यांची ओळख निर्माण झाली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदाच्या हंगामात उसाची मोठी टंचाई आहे.

हे जरी खरे असले, तरी अनेक प्रयोगशील शेतकरी यंदाही एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. या स्पर्धेत जगताप यांनी विक्रमी कामगिरी केली आहे. जगताप यांनी ‘को. ८६०३२’ जातीच्या उसाचे उत्पादन एकरी १३७ टन ६०० किलो इतके घेतले आहे.

२ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जगताप यांच्या शेतातील उसाची तोड करण्यात आली. त्यामध्ये जगताप यांनी ऊस उत्पादन वाढीचा केलेला विक्रम ऊस विकास विभागाने नुकताच पुढे आणला. हा विक्रम इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे अधिकारी सुरेश काळे यांनी सांगितले.

विशेषतः या लक्षवेधी कामगिरीचे पडसाद माळेगावच्या कार्यक्षेत्रात पडले आणि जगताप यांच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यामध्ये संचालक मंडळही मागे राहिले नाही. अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक योगेश जगताप, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे आदींनी जगताप यांचे अभिनंदन केले.

जगताप म्हणाले, ‘‘शेती बरोबरच मेंदूचीही मशागत करत गेलो. नवनवीन गोष्टी शिवारात राबवत गेल्यामुळे एकरामध्ये १३७ टनांचे लक्षक्ष्य गाठता आले. आपल्याकडे शेती क्षेत्राविषयी नकारात्मकतेचे वातावरण निर्माण केले जाते. त्याकडे फारसे लक्ष न देता शिफारशीनुसार नियोजन केल्यास एकरी शंभरच नव्हे, त्याहीपेक्षा अधिक उत्पादन घेता येते. दीडशे टनाचे उद्दिष्ट्य ठेवून काम केल्यामुळे मला यंदा १३७ टन ऊस उत्पादन मिळाले आहे.’’

संजय जगताप यांची खऱ्याअर्थाने काळ्या मातीतले महानायक म्हणून बारामतीत नवी ओळख झाल्याचे आम्हालाही समाधान आहे. माळेगावच्या प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो
- योगेश जगताप, संचालक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT