Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond : शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अनास्था

Farm Pond Scheme : शेततळ्यांसाठी शेतातील जमीन जात असल्याने शेततळे खोदण्यास शेतकऱ्यांची अनास्था प्रकर्षाने दिसून आली आहे.

Team Agrowon

Amravati Pond News : शेततळ्यांसाठी शेतातील जमीन जात असल्याने शेततळे खोदण्यास शेतकऱ्यांची अनास्था प्रकर्षाने दिसून आली आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या मुख्यमंत्री संरक्षित कृषी सिंचन व पुनर्भरण योजनेतील वैयक्तिक शेततळ्यांचे लक्ष्यांक गाठण्यात या विभागास यश मिळू शकलेले नाही.

एकूण ५०० शेततळ्यांच्या लक्ष्यांकापैकी केवळ दोन शेततळे पूर्ण झाले असून १७ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. मात्र खरीप हंगाम सुरू झाल्याने ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.

पावसाचा खंड पडल्यास पिकांना पाणी देण्याची सोय असावी या उद्देशातून संरक्षित सिंचन व पुनर्भरण योजनेंतर्गत शेततळ्याची तरतूद आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदान देण्यात येते. साधारणतः ३० हजार ते ७५ हजार रुपयांच्या अनुदानाची तरतूद आहे.

अमरावती जिल्ह्यांसाठी ५०० शेततळ्याचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले होते. सोडत पद्धतीने या योजनेत ६६३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यातील १८८ शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटींमुळे रद्द करण्यात आलेत. तर, ४६७ पैकी १७७ शेतकऱ्यांनीच त्यांची या अनुदानासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड केलेली आहेत.

१७ शेतकऱ्यांना जिल्हा कृषी कार्यालयाकडून शेततळ्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले असून दोघांनीच शेततळे खोदली आहेत. यातील एकाला अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती उपसंचालक अनिल खर्चान यांनी दिली.

ज्या १७ शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत त्यामध्ये चांदूर बाजार येथील ४, अमरावती ८, मोर्शी २, नांदगाव खंडेश्वर १ व वरूड तालुक्यातील २ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने देयक सादर केल्यानंतर त्यास अनुदान देण्यात येते.

जमीन जात असल्याने अनास्था

शेततळ्याचे भीन्न प्रकारचे आकारमान ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची साधारणतः १० गुंठे जमीन जात असल्याने तेवढ्या क्षेत्रावर पिकं घेता येत नाहीत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. जमीन जात असल्याने शेतकरी शेततळ्यासाठी सहसा तयार होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

ऐन हंगामात पावसाचा खंड पडल्यास पाण्याअभावी पिकांचे २० टक्केपर्यंत नुकसान होते. एका तळ्यात साधारणतः दोन घनमीटर पाणी साठवता येते. त्याचा उपयोग होऊ शकतो. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT