Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: ‘दक्षता’, ‘गुणनियंत्रण’मधील वादातून झाला खोटा पत्रव्यवहार

Vigilance and Quality Control Department Internal Dispute: कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग आणि दक्षता पथकातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादातून होणारा खोटा पत्रव्यवहार व त्यातून मनस्ताप कसा होतो, याचा अनुभव सध्या कृषी विभागाचे प्रशासन घेत आहे.

मनोज कापडे

Pune News: कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग आणि दक्षता पथकातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादातून होणारा खोटा पत्रव्यवहार व त्यातून मनस्ताप कसा होतो, याचा अनुभव सध्या कृषी विभागाचे प्रशासन घेत आहे.

‘रासायनिक खते, सूक्ष्ममूलद्रव्य उत्पादक, बियाणे व कीटकनाशक निर्मितीमधील उत्पादकांना वेठीस धरले जाते. त्यासाठी अधिकाऱ्यांचा उपयोग केला जातो व नकार दिल्यास खोट्या तक्रारींच्या आधारे विनाकारण बदल्या केल्या जातात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी,’ असा उल्लेख या बनावट तक्रारीमध्ये होता.

आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की गुणनियंत्रण विभाग आणि दक्षता पथकातील अधिकारी सतत वादात असतात. गुणनियंत्रण विभागातील दोन अधिकाऱ्यांनी मंत्रालयात साटेलोटे करीत एकाच पदावर नियुक्ती मिळवली होती. त्यातील एकाला हटविण्यात आले होते. त्यानंतर कृषी आयुक्तांनी गैरव्यवहाराच्या संशयामुळे दक्षता पथकाचे प्रमुख गोविंद मोरे यांना हटविले होते.

विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच तंत्र अधिकाऱ्याच्या नावाने आणखी एक लेखी तक्रार थेट कृषी सचिव व आयुक्तांना प्राप्त झाली. याबाबत प्राथमिक चौकशी करून कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना अहवाल पाठविण्याचीदेखील तयारी सुरू झाली होती. परंतु, दुसऱ्या बाजूला पत्रातील मजकुराबाबत संशयदेखील शंका येत होती.

त्यामुळे आस्थापना विभागाने संबंधित मूळ तंत्र अधिकाऱ्याला तक्रारीबाबत विचारणा केली. या अधिकाऱ्याने तक्रार बनावट असल्याचा निर्वाळा दिला. खोट्या तक्रारी देणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे, अशी भावना संबंधित अधिकाऱ्याने बोलून दाखवली. या बनावट तक्रार प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या गुणनियंत्रण विभाग व दक्षता पथकातील अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

‘खोट्या’च्या गोंधळात ‘खरे’ दुर्लक्षित

या संदर्भात एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले, की अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादातून असे प्रकार घडू शकतात. तक्रार सत्य नसल्याचा लेखी खुलासा संबंधित अधिकाऱ्याने आस्थापना विभागाकडे केला आहे.

त्यामुळे चौकशीची पुढील प्रक्रिया होणार नाही. तथापि, यातून अधिकाऱ्यांमध्येच आणखी बेबनाव तयार होतो. अशा खोट्या तक्रारींचे दुष्परिणाम इतर चौकशांवरही होतात. गैरव्यवहार करणारे कंपू अशा प्रकरणाचा फायदा घेत खऱ्या तक्रारीदेखील खोट्या असल्याचा आभास निर्माण करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT