Fake Fertilizer Seized  Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer : बनावट खत विक्रीचा प्रकार उघडकीस

Fertilizer Black Market : खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून पेरणी नियोजन सुरू असून बाजारात खतांची मागणी वाढली आहे.

Team Agrowon

Nashik News : खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून पेरणी नियोजन सुरू असून बाजारात खतांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही घटक वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन आदिवासी भागात बनावट खतांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

एका कंपनीच्या नावाने बनावट रासायनिक खतांची तस्करी होत असल्याचा प्रकार हरसूल (ता.त्र्यंबकेश्वर) येथे उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत अंदाजे साडेतीन लाखांचे बनावट खते आणि त्यांची वाहतूक करणारी आयशर गाडी मिळून सुमारे १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रासायनिक शेतकऱ्यांकडून खतांची मागणी वाढत असतानाच, मंगळवारी (ता.१५) कृषी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार,हरसूल परिसरात संशयास्पदरित्या खते वाहून नेणारी आयशर कंपनीची गाडी (क्रमांक एमएच.१५ एफव्ही ७७१७) तपासण्यात आली. संबंधित कंपनीच्या नावाने बनावट १०:२६:२६ या प्रकारातील खताच्या २४० बॅग्ज जप्त करण्यात आल्या.

या खतांची एकूण किंमत अंदाजे ३ लाख ३० हजार रुपये असून, वाहनासह मिळून एकूण १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, विभागीय निरीक्षक कल्याण पाटील, कृषी अधिकारी रामा दिघे,पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे आणि इतर पोलिस कर्मचारी सहभागी होते.

जप्त केलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात चालक प्रभाकर भामरे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईस विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांचे मार्गदर्शन लाभले.

शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

शेतकऱ्यांनी घरपोच मिळणाऱ्या अनुदानित खतांची खरेदी करू नये. खते खरेदी करताना पिशवी पूर्णपणे सिलबंद आहे, तसेच त्यावरील माहिती खत नियंत्रण आदेशानुसार आहे याची खात्री करावी. खते अधिकृत विक्रेत्यांकडूनच, पक्क्या बिलासह आणि ई-पॉस मशिनद्वारे खरेदी करावीत. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन सुभाष काटकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT