Agriculture Advisory Maharashtra: हवामानातील अनिश्चिततेमुळे अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याबरोबरच दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतरच भात पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. .कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतात किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा वाफसा तयार झाल्यानंतर भाताची टोकण किंवा विस्कटून पेरणी करावी..Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय.अपुऱ्या पावसावर पेरणीनंतर पडणाऱ्या कडक उन्हामुळे अंकुर जळून जाण्याची शक्यता असते. बियाणे, खते, मजुरीवर झालेला खर्च वाया जाऊन दुबार पेरणी करावी लागू शकते..Paddy Nursery Crisis: भात रोपवाटिका संकटात; पावसाअभावी दुबार पेरणीची भीती.तसेच शेतकऱ्यांनी भातबियाणे, खतांची खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी. खरेदीची पक्की पावती तसेच बियाण्यांचे पाकीट जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे..खबरदारी घ्याशेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिकेद्वारे खात्रीशीर सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनीच रोपवाटिका तयार करण्यास प्राधान्य द्यावे.हवामानातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पेरणी करावी, असे आवाहन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.