Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित विस्तार कार्य हवे

Farmers Issue : हवामान बदलांमुळे शेती व्यवसायापुढे निर्माण झालेल्या विविध आव्हानांना सामोरे जात असताना शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित व समस्या समजून घेत कृषी विस्तार कार्य करण्यावर भर द्यावा लागेल.

Team Agrowon

Parbhani News : हवामान बदलांमुळे शेती व्यवसायापुढे निर्माण झालेल्या विविध आव्हानांना सामोरे जात असताना शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित व समस्या समजून घेत कृषी विस्तार कार्य करण्यावर भर द्यावा लागेल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हे विस्तार कार्याचे उत्कृष्ट मॉडेल असून, त्याचा देशभरात प्रसारात झाला पाहिजेत, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक (विस्तार) डॉ. आर. एन. पडारिया यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत विस्तार शिक्षण परिषदेच्या २७ व्या बैठकीत बुधवारी (ता. २३) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव संतोष वेणीकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य भीमराव डोणगापूरे, जनार्दन आवरगंड आदींची उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की भारतीय कृषी संशोधन संस्थेने उत्तर भारतात राबविलेल्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या कृषी विस्तार कार्य मॉडेलच्या धर्तीवर मराठवाड्यामध्ये ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रमाद्वारे कृषी शास्त्रज्ञ थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनावर माहिती देत आहेत. डॉ. पडारिया म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्रांनी नवसंशोधक शेतकरी, महिला, युवकांना शेतीसाठी प्रोत्साहन द्यावे.

समर्पित भावनेने तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत विस्तार कार्य करावे. डोणगापुरे म्हणाले, की शेतकऱ्यांना मार्च महिन्यात माती परीक्षण करून दिले पाहिजे. डॉ. आसेवार यांनी विद्यापीठाच्या वर्षभरातील विस्तार कार्याचा आढावा तर डॉ. देशमुख यांनी मागील वर्षातील बैठकीच्या ठरावावर केलेली कार्यवाही अहवाल सादर केला. विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, विषय विशेषज्ञ अधिकारी उपस्थित होते.

विस्तार कार्यातील अडचणी व गरजा...

मराठवाड्यात दोन जिल्ह्यांसाठी एक विस्तार कृषिवेत्ता, विभागीय कृषी विस्तार केंद्रांना स्वतंत्र विशेषज्ञ उपलब्ध करून देण्याची गरज.

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी स्वतंत्र जिल्हा विस्तार शिक्षण केंद्र स्थापनेसाठी प्रस्ताव सादर, राष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदेच्या कृषी विद्यापीठे कार्य पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार एक उपसंचालक (विस्तार शिक्षण), चार विस्तार कृषिविद्या पदांच्या निर्मितीचा प्रस्तावर कुलसचिव कार्यामार्फत सादर.

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करणे आवश्यक.

विस्तार शिक्षण संचालनालयास अत्यल्प निधी उपलब्ध करून देण्यात येते, निधीमध्ये वाढ करण्याची गरज.

शेतकऱ्यांच्या निवास व्यवस्थेकरिता अद्ययावत नवीन इमारत बांधकाम करण्याची गरज.

विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी विज्ञान केंद्रातील रिक्त पदे तत्काळ भरण्याची गरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mushroom Benefits : आरोग्यदायी अळिंबी

Leafy Vegetables Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीत कोथिंबीरची आवक वाढली; लसूण दरात वाढ

Crop Pattern : व्यावसायिक पीकबदलातून चितळवेढेत समृद्धी

Gram Panchayat Administration : लोकाभिमुख असावे ग्रामपंचायतीचे नियोजन...

Medicinal Plants : औषधी वनस्पती विकासातील खोडे काढा

SCROLL FOR NEXT