Agriculture Work : पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांनी घेतला वेग

Rabi Season : खानदेशात मध्यंतरी काही भागांत पाऊस झाला आहे. परंतु सध्या पाऊस नाही. तसेच मोठ्या क्षेत्रात पाऊस सध्या नसल्याने शेतीकामे गतीने सुरू आहेत.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मध्यंतरी काही भागांत पाऊस झाला आहे. परंतु सध्या पाऊस नाही. तसेच मोठ्या क्षेत्रात पाऊस सध्या नसल्याने शेतीकामे गतीने सुरू आहेत. अनेक भागांत कोरडे, ढगाळ वातावरण आहे.

मागील दोन दिवसांपासून अधूनमधून सूर्यदर्शन होत असून, विविध पिकांत आंतरमशागत, फवारणी, तणनियंत्रण आदी कामे हलक्या, मध्यम जमिनीच्या भागात सुरू झाली आहेत. तसेच अनेकांना रब्बीची पेरणी करायची असल्याने नीरभ्र वातावरणाची प्रतीक्षाही आहे.

Rabi Season
Rabi Season 2024 : अति पावसामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर

सध्या उष्णताही आहे. गारवा रात्रीही नसतो. उकाडा आहे. यामुळे शेतीकामे करताना शेतकरी सकाळीच शेतात पोहोचत आहेत. कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर दुपारी पोहोचते. मध्यंतरी काही दिवस सतत पाऊस झाला. यामुळे कापूस पिकात तणनियंत्रण, फवारणी, खते देणे आदी कामे ठप्प झाली होती.

यातच सध्या पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी कमी वाफशातदेखील तण नियंत्रण, खते देणे, फवारणीची कामे हाती घेतली आहेत. तणनियंत्रणदेखील हलक्या, मध्यम जमिनीत सुरू झाले आहे. पण ज्यांना रब्बीची तयारी करायची आहे, त्यांना कोरड्या वातावरणाची प्रतीक्षा आहे, ऊन तापत असल्याने जमिनीतील वाफसा नाहीसा होईल व पुढे पेरणीला गती येऊ शकते.

Rabi Season
Rabi Season 2024 : यंदा रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

उकाडा व उष्णता, ढगाळ वातावरण अशा स्थितीत पीक वाढ कमीअधिक आहे. केळी, पपई पिकाला नीरभ्र वातावरणाची गरज आहे. यातच कापूस, तूर, भाजीपाला पिकात तणनियंत्रण, कापूस वेचणी, फवारणी, आंतरमशागत आदी कामे सुरू असल्याने मजूरटंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात उडीद, सोयाबीन, कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती पावसाने खराब झाली.

हलक्या, उताराच्या, माथ्यावरील जमिनींमध्ये पीकस्थिती बरी होती. पूर्वहंगामी व पाच जूनपर्यंत लागवड केलेल्या कापूस पिकात वेचणीचे काम सुरू आहे. शेतीकामे एकाच वेळी सुरू झाल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. केळी काढणीलाही वेग आला आहे. वातावरण कोरडे असल्याने शिवारांत काढणीसाठी ट्रक, मोठी वाहने पोहोचू लागली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com