Bribe News Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Bribe News : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील विस्तार अधिकाऱ्यांनी निलंबन रद्द करून चौकशीअंती पुनर्स्थापित करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील विस्तार अधिकाऱ्यांनी निलंबन रद्द करून चौकशीअंती पुनर्स्थापित करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला करण्यात आली होती.

तक्रारीत तथ्य आढळल्याने लाचलुचपत विभागाने पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रामदास चंदणकर (वय ५७) यांना ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रामदास चंदणकर यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आर्णी तालुक्यातील ग्रामसेवकाने केली होती.

एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली. या प्रकरणात पैशाची मागणी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने सापळा रचला. ठरल्यानुसार तक्रारदार पैसे घेऊन संबंधित लोकसेवकांकडे गेला. विस्तार अधिकारी चंदनकर यांनी या वेळी लाचेची रक्कम स्वीकारली नाही.

यामुळे लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक अनिल पवार, पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनायक कारेगावकर, अमित वानखडे, जयंत ब्राम्हणकर, अतुल मते, सचिन भोयर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सतीश सोनोने, सूरज मेश्राम, भागवत पाटील, इफराज काझी, संजय कांबळे आदींनी पार पाडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT