Bribe News : वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे अखेर निलंबित

Anti Corruption Bureau : गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांना अखेर शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
Arrest In Bribe
Arrest In BribeAgrowon

Pune News : गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांना अखेर शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कवडे यांच्या निलंबनाचा आदेश पारित केला आहे. कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबित केल्याने त्यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

भोसरी येथे एकाच गावात, एकाच गट‌ नंबरमधील फेरफारबाबत जयश्री कवडे यांनी तीन वेळा आदेश पारित केले होते. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांना निलंबित केले होते.

Arrest In Bribe
Kolhapur Bribe Case : 'कुंपणच जेव्हा शेत खाते' जिल्हा भूमी अधीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

त्यानंतर थेऊर मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना १३ मार्च रोजी त्यांच्यासह त्यांच्या दोन व्यक्तींना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा एसीबीने दाखल केला. मात्र, कवडे या त्या दिवसापासून फरार असल्याने जिल्हाधिकारी सुहास.

Arrest In Bribe
Bribe News : महिला सरपंच पतीसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

दिवसे यांनी त्यांचे १९ मार्चला निलंबित केले आहे.

दरम्यान, जयश्री कवडे (Jayashree Kawade) यांच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कवडे या गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच १३ मार्च २०२४ पासून आढळून आलेल्या नाहीत. तसेच त्यांनी कार्यालयाशी कोणताही संपर्क साधलेला नसल्याने त्यांना शासन सेवेतून गुन्हा दाखल झालेल्या तारखेपासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्या निलंबित राहतील, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

काय आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...

- थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, जुन्नर हे असेल.

- जुन्नर तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

- निलंबन कालावधीत कवडे यांनी खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा व्यवसाय करू नये, तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

- नोकरी केल्यास कवडे निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील.

- निलंबन कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या वेळी खासगी नोकरी स्वीकारली नाही किंवा खासगी धंदा व व्यापार करीत नाही, अशा तऱ्हेचे प्रमाणपत्र जयश्री कवडे यांनी द्यायचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com