Cashew Seed Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Seed Subsidy : काजू बी अनुदानाच्या अर्जासाठी देण्यात आली मुदतवाढ

Government Subsidy For Cashew Seeds: मंडळाने काजू बी अनुदानासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांनी काजू बी अनुदानासाठी अर्ज केला नाही, अशी शेतकरीही आता अर्ज करू शकतात.

Dhananjay Sanap

Agriculture News: काजू बी अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती.

परंतु बहुतांश काजू उत्पादक शेतकऱ्यांनी अर्जाला मुदत वाढ देण्याची मागणी केली. त्यामुळे आता राज्य सरकारनं ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत काजू बी अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. शेतकऱ्यांना काजू बी अनुदानासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

राज्य सरकारनं काजू उत्पादकांसाठी ही योजना सुरू करणीयचा निर्णय घेतला. तयासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य काजू मंडळाची नियुक्ती करण्यात आली. परंतु कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अडचणीना सामना करावा लागला.

काजू उत्पादक शेतकरी काजू बी अनुदानापासून वंचित राहतील, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेला मुदत वाढ देण्याची मागणी महाराष्ट्र काजू मंडळाचे संचालक परशराम पाटील यांच्या केली होती.

अखेर मंडळाने काजू बी अनुदानासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांनी काजू बी अनुदानासाठी अर्ज केला नाही, अशी शेतकरीही आता अर्ज करू शकतात. अर्ज करताना काजू बी विक्री पावती, सातबारा उतारा, आधार संलग्न बचत बँक खाते क्रमांक तपशील आणि कृषी विभागायच्या अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे.

दरम्यान, राज्यात अंदाजे १.९१ लाख हेक्टर क्षेत्र आहे. राज्यात दरवर्षी १.८१ लाख टन काजू उत्पादित होतो. प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काजूचं उत्पादन घेतलं जातं. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच राज्यातील काजूची हेक्टरी ९८२ किलो उत्पादकता आहे. त्यामुळे काजू उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. तर सिंधुदुर्ग येथील काजूला जीआय टॅगही मिळालेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT