Agriculture Admission 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Degree Admission: कृषी पदवीसाठी अर्ज भरण्यास रविवारपर्यंत मुदतवाढ

Admission Extension: राज्यातील कृषी व कृषिसंलग्न पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ही निर्णय घेण्यात आला आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्यात कृषी व कृषिसंलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्यास २७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी व कृषिसंलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता राज्यात १७ हजार ७७६ जागांसाठी प्रवेश दिले जातील. प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याकरिता ऑनलाइन प्रवेश भरण्यास चार जुलैपासून सुरुवात झाली आहे.

प्रवेश अर्ज भरण्याची मुदत यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार १७ जुलैस समाप्त झाली होती. परंतु महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला सादर केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाऊस तसेच इंटरनेट संपर्कातील गैरसोयी यामुळे वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, असे परिषदेचे म्हणणे होते.

खासगी महाविद्यालयांमध्ये यंदा १४१५० जागा

परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी कृषी परिषदेच्या प्रस्तावानुसार दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. “राज्यात विविध नऊ विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या सरकारी महाविद्यालयांमधील जागा तीन हजार ६२६ इतक्या आहेत. तसेच खासगी महाविद्यालयांमधील जागांची संख्या १४ हजार १५० आहे.

प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, उतारे अपलोड करावे लागतात. काही भागात सरकारी कार्यालयांमधून दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही कृषी अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरता आलेले नव्हते. मात्र, आता अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे अर्जांची संख्यादेखील वाढू शकते, अशी माहिती परिषदेच्या सूत्रांनी दिली.

कृषी व कृषिसंलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ हवी होती. तसा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दिला होता. हा प्रस्ताव राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने मान्य केल्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे.
यशवंत साळे, शिक्षण संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Munghantiwar: मुनगंटीवार यांनी विधिमंडळात उपस्थित केलेले शेतीचे प्रश्‍न ठरले लक्षवेधी 

Solar Pump Issues: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत

Wild Vegetable Festival: रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Nanded Rain: नांदेडला पावसामुळे खरिपाला जीवदान

Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद

SCROLL FOR NEXT