Crop Insurance : पीक विम्याला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Crop Insurance Application : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Raigad News : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा घेण्याची संधी दिली आहे.

ॲग्रीकल्चरल इन्सुरन्स कंपनीमार्फत हा विमा उतरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यासाठी भातपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ६१ हजार रुपये असून नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये आहे. त्यासाठी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेंतर्गत भातासाठी एक एकर क्षेत्राकरिता १८३ रुपये तर एक हेक्टर क्षेत्रासाठी ४५७ रुपये हप्ता असणार आहे.

Crop Insurance
Crop Insurance Maharashtra : पीकविम्याबाबत कृषिमंत्र्यांचा दावा फोल

तसेच, डोंगरभागात नाचणीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या लागवडीतून शेतकऱ्यांना उभारी मिळावी, म्हणून नाचणीच्या क्षेत्रातही वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नाचणी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक एकर क्षेत्रासाठी ३५ रुपये व एक हेक्टर क्षेत्रासाठी ८७.५० रुपये हप्ता असणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ करीता शेतकरी नोंदणीसाठी ३१ जुलै अंतिम तारीख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, तालुका प्रतिनिधी राहुल लाडगे व जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम सरनाईक यांनी केले आहे.

Crop Insurance
Crop Insurance Payout : परभणी जिल्ह्यात १ कोटी रुपयांवर पीकविमा वाटप प्रलंबित

‘ही’ कागदपत्रे आवश्यक

फार्मर आयडीची गरज आहे. सातबारा, आठ ‘अ’चा उतारा आवश्यक आहे. सोबत आधारकार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणा पत्र, किसान क्रेडीट कार्ड व ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच, सेवा केंद्र, बँकेत व विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

...त्यांनाच विम्याचा लाभ

आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यात पेरणी न होणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण दिला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com