Agricultural exports Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural exports : पहिल्या सहामाहीत कृषी निर्यातीत घसरण; बिगर-बासमती तांदळाची निर्यातीही १७ टक्क्यांनी घटली

Agricultural exports in first half : भारताच्या विदेशी व्यापारात घट झाली आहे. पहिल्या सहामाहीत बिगर बासमती तांदळ्याच्या निर्यातवरही परिणाम दिसून आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : भारताच्या कृषि निर्यातीत पहिल्या सहामाहीत एका टक्कांची घसरण झाली आहे. ती १२१३ कोटी डॉलरवर स्थिरावली आहे. तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत १७ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र मांस, ताज्या फळांच्या निर्यातीत २०२४ च्या तुलनेत वाढ झाली आहे.

ऑक्टोंबर २०२३ मध्ये सरकारने बासमती तांदळासह बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर शुल्क लादले होते. पण गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने तो शुल्क हटवला. यामुळे बासमती तांदळाची निर्यात ११ टक्क्यांनी वाढून ती २२७ कोटी डॉलरवर गेली आहे.

पहिल्या सहामाहीत बिगर-बासमती तांदळाची निर्यात १७ टक्क्यांची कमी होऊन ती २२५ कोटी डॉलर झाली होती. तर ही घसरण निर्यातीवरील निर्बंधांमुळे झाली. पण आता निर्बंध हटवल्यानंतर यात सुधारणा होत आहे. आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांबरोबर भारताची निर्यात वाढण्याची शक्यता असल्याचेही सरकारी सुत्रांनी म्हटले आहे. तर अशी आशा व्यापार सुत्रांनी व्यक्त करताना जागतिक व्यापारात तांदळाच्या निर्यातीत भारत पुढे असेल असेही सुत्रांचे म्हणणे आहे.

मांसाच्या निर्यातीत ४ टक्क्यांनी वाढ

पहिल्या सहामाहीत म्हशीच्या मांसाची निर्यात ४ टक्क्यांनी वाढली आहे. ती १८० कोटी डॉलर झाली. तर २०२२-२३ च्या कालावधीत १७३ कोटी डॉलरची निर्यात होती. गेल्या एक दशकात, भारतीय मांसाची गुणवत्ता, पोषण मूल्य आणि जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या (OIE) मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम केल्याने जागतिक स्तरावर मासांची मागणी वाढल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ताज्या फळांची निर्यातीत वाढ

जगभरात अनेक कृषी उत्पादनांची मागणी वाढत असून पहिल्या सहामाहीत ताज्या फळांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. यात केळी, आंबे, प्रक्रिया केलेल्या फळांचा रस, फळे आणि भाज्यांच्या बियाणे आणि प्रक्रिया केलेल्या भाज्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत ताज्या फळांच्या झालेल्या निर्यातीत ४० कोटी डॉलरची वाढ झाली आहे. ताज्या भाज्यांची निर्यात ४ टक्क्यांनी कमी होऊन ती ०.४३ कोटी डॉलर झाली आहे.

एपीडाच्या निर्यातीचा हिस्सा

भारताच्या कृषी आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्यात ६ टक्क्यांनी कमी झाली असून ती २५०१ कोटी डॉलर झाली आहे. कृषी आणि प्रक्रिया उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) २०२५ साठी २८७२ कोटी डॉलरच्या निर्यातीचे लक्ष निर्धारीत केले आहे. तर कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत सुमारे ५१ टक्के हिस्सा एपीडाचा आहे. उर्वरित कृषी उत्पादनांच्या निर्यातीत समुद्री उत्पादने, तंबाखू, कॉफी आणि चहा यांचा समाविष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT