Grape Export Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Export: द्राक्षपंढरीतून ४० हजार टनांनी निर्यात कमी

Grape Production: महाराष्ट्रातील द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घटले आहे. अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे एकूण उत्पादन ४० टक्क्यांनी कमी झाले.

मुकुंद पिंगळे

Nashik News: देशभरात द्राक्ष निर्यातीसाठी नाशिकची ओळख आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत नैसर्गिक आपत्तीमुळे २०२४-२५ हंगामात उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट दिसून आली. त्यामुळे युरोपियन व बिगर युरोपियन देशात मागील वर्षी झालेल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत (१ एप्रिलअखेर) द्राक्ष निर्यात जवळपास ४० हजार टन कमी आहे. मात्र हंगाम सुरू असल्याने निर्यात वाढ अपेक्षित आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा देशभरात द्राक्ष उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. तर देशातील एकूण निर्यातीमध्ये नाशिकचा वाटा ९१ टक्के आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांत ५८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवडी आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड हे प्रमुख उत्पादक तालुके आहेत.

२०२४–२५ हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक राहिला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात गोडी बहर छाटणी दरम्यान व नंतर अतिवृष्टी तसेच मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्षपंढरीतील बागा अडचणीत सापडल्या. एकंदरीत हंगामात उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत कमी आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात जानेवारी महिन्यात निर्यात सुरू झाल्यानंतर मालाची उपलब्धता तुलनेत कमी दिसून आली.

ग्रेपनेट प्रणालीत १३ तालुक्यांमध्ये द्राक्ष बागांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५०४ द्राक्ष बागा तर ३२३ हेक्टर क्षेत्र अधिक नोंदविले गेले. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्यातहंगामाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये द्राक्ष निर्यातीच्या कामकाजात अडथळे आले. युरोपातील नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, यू.के., तर नॉन युरोपियन रशिया, तुर्की, चीन व आखाती देशांमध्ये निर्यात झाली आहे.

प्रामुख्याने सफेद वाणात थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका तर रंगीत द्राक्ष वाणात शरद सीडलेस, क्रीमसन सीडलेस तर काही प्रमाणात रेडग्लोब या वाणांची निर्यात झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात स्थिती :

हंगाम....२०२३-२४...२०२४-२५

युरोपियन देश...११८१९५.३४...९१४१७.१३

नॉन युरोपियन देश...३८७०९.८७...२६१८२

आर्थिक वर्ष...२०२०–२१...२०२१–२२...२०२२–२३...२०२३–२४...२०२४–२५

ग्रेपनेट प्रणाली द्राक्ष प्लॉट नोंदणी संख्या...३७५५७...३४२९५...३१९२३...२८४६०...२८९६५

द्राक्ष प्लॉट नोंदणी क्षेत्र (हेक्टर)...२४०५५...२१९५०...२०४३१...१८२१४...१८५३७

निर्यात (टन)...१२६९१२...१२२३३०...१५३४६५...१५६९०५...११७९९

जानेवारीमध्ये प्रामुख्याने द्राक्ष निर्यात कमी झाली, त्यामुळे निर्यातीच्या आकडे तफावत दिसते. सप्टेंबरदरम्यान आगाप छाटणीवेळी पाऊस झाल्याने सुरुवातीच्या टप्प्यात उत्पादनावर परिणाम दिसून आला. जानेवारीत निर्यात कमी झाल्याने ही स्थिती आहे. मात्र फेब्रुवारी व मार्चमध्ये निर्यातीच्या कामकाजावर फारसा फरक पडलेला नाही. यासह देशांतर्गत बाजारात गुणवत्तेमुळे मागणी वाढली ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल.
विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी, जि. नाशिक
गेल्या ४ वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागा कमी झाल्या, तर सुरुवातीच्या टप्प्यात पावसामुळे नुकसान झाल्याने एकरी उत्पादकता घटल्याने मालाची उपलब्धता कमी होती. त्यामुळे निर्यात सुरुवातीला कमी झाल्याने टक्का घटल्याचे चित्र आहे.
बाळासाहेब गडाख, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT