Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cultivation : अतिघन आंबा लागवडीतून निर्यात योग्य उत्पादन शक्य

Mango Production : गटशेतीत केलेल्या अतिघन लागवड आंब्यामध्ये आता बऱ्यापैकी निर्यातयोग्य उत्पादकता सुरू होऊ शकते, असे मत गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : गटशेतीत केलेल्या अतिघन लागवड आंब्यामध्ये आता बऱ्यापैकी निर्यातयोग्य उत्पादकता सुरू होऊ शकते, असे मत गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

नुकताच ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा २४० वा द्वादश शेतकरी मेळावा प्रकाश कापसे देळेगव्हाण (ता. जाफराबाद) यांच्या शेतात उत्साहात पार पडला. त्या वेळी विलास पंडित, गोविंदराव पंडित तसेच प्रकाश कापसे यांच्या अतिघन लागवड आंबा बागेत शिवार फेरी केल्यानंतर डॉ. कापसे बोलत होते.

श्री. कापसे म्हणाले, की यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिला तसेच ढगाळ वातावरण सुद्धा जास्त दिवस राहिले. सप्टेंबरपर्यंत उन्हाचा चटका न पडल्याने सप्टेंबरची पालवी यावर्षी न येता आता हळूहळू सुरू झाली आहे. मात्र त्याचबरोबर काही पालवी तर काही न पालवी आलेल्या काड्या मात्र पूर्णतः पक्व झाल्याने त्यावर काही ठिकाणी २० ऑक्टोबरपासूनच मोहर दिसायला सुरुवात झाली आहे.

आता आपल्या बागेत पोटॅशियम नायट्रेट चार टक्के याची फवारणी घ्यावी. जेणेकरून मोहोर वेळेवर व जोमदार येईल. सर्वसाधारणतः यावर्षी १५ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान पूर्ण मोहोर बाहेर पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आंबा काढणी ही अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते.

शिवाय लवकर आल्यामुळे सुरुवातीला भाव तर अगदी दोनशे रुपयांपेक्षा जास्त मिळू शकतो. त्याचबरोबर आतापासून मोहोर संरक्षणासाठी कशी काळजी घ्यावी. काय फवारावे याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. या वेळी डॉ. सूर्यकांत पवार यांनी सोयाबीन काढल्यानंतर त्यात घ्यावयाची विविध रबी पीक, कापसामध्ये सेंद्रिय बोंड अळी नियंत्रण याविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. एस. एस. माने यांनी कापसाचे झालेले बोंडे सड, सेंद्रिय बोंड अळी नियंत्रण तसेच कापसाचे स्वच्छ कापूस काढणी व मार्केटिंग याबाबत सविस्तर माहिती दिली. माजी सभापती गोविंदराव पंडित यांनी आपल्या आंबा बागेची यशोगाथा सविस्तर विशद केली.

डॉ. शरद कापसे यांनी दुभत्या जनावरांची घ्यावयाची काळजी व त्याद्वारे उत्पादन कसे वाढू शकते याविषयीचे सविस्तर विवेचन केले. मोतीराम कदम (वरुड नाका), लक्ष्मण सवडे (अकोला), राजू घोडके (डोणगाव), प्रकाश कापसे (देळेगव्हाण), ज्ञानेश्वर मिसाळ (वालसा), पंढरीनाथ पालोदे (केदारखेडा), भगवानराव बनकर (गाडेगव्हाण) या गटप्रमुखांनी आपल्या गटाच्या अहवाल सादर केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply : ‘कोकाकोला’चे पाणी बंद करा

Golden Sitafal : गोल्डन सीताफळाकडे ग्राहकांची पाठ

Paddy Harvesting : यंत्राद्वारे भातकापणीला वेग

Seed Supply : महाबीजकडून परभणीत १० हजार क्विंटल बियाणे पुरवठा

Agrowon Podcast : कांद्याचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे हरभरा दर ?

SCROLL FOR NEXT