Vermicompost Poduction Agrowon
ॲग्रो विशेष

Vermicompost Production : विदर्भातून प्रथमच गांडूळ खताची निर्यात

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत उद्योजकता विकास फोरमचे सदस्य कृषी पदवीधर प्रवीण वानखडे यांच्या प्रयत्नातून तथा युनिव्हर्स एक्स्पोर्टचे माध्यमातून विदर्भातून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी तथा विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातून अशा प्रकारे गांडूळ खत निर्यातीचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

या निर्यातीचे पहिले कंटेनर रवाना झाले. या वेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, विद्यापीठ शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

विदर्भातील पशुधनाचा विचार करता अत्यल्प दूध उत्पादकतेमुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन फायदेशीर ठरत नसताना उपलब्ध शेण व गोठ्यातील वाया जाणारे मलमूत्र तथा चाऱ्याचे अवशेष इत्यादींच्या प्रभावी वापरातून गांडूळ खत तथा व्हर्मिवॉशची निर्मिती आर्थिक लाभ देणारी ठरत आहे.

गुणवत्तापूर्ण गांडूळ खत निर्यातीसाठी आता विद्यापीठाच्या सहयोगातून पर्याय उपलब्ध झाला असून युनिव्हर्स एक्सपोर्टचे सर्वेसर्वा तथा कृषी पदवीधर प्रवीण वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. गडाख यांनी दिली. विदर्भातील शेती शाश्‍वत आणि शेतकरी होण्यासाठी पशू आधारित एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर असल्याचे सांगितले.

विदर्भातून प्रथमच कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी तथा विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यात झाले. याप्रसंगी पहिल्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी समूह गटांचे महत्त्व व त्यातून साध्य होणारा ग्रामविकास मांडला.

आता एकट्याने नव्हे तर समूहाने एकत्रित येत सर्वच शासकीय निमशासकीय विभागांचे सहयोगातून स्वतःचा आणि पर्यायाने गावाचा विकास करण्यासाठी युवा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे विणावे असे आवाहन केले. गुणवता व आर्थिक निकषावर बाजारात टिकणारा ब्रँड आणल्यास खऱ्या अर्थाने शाश्‍वत ग्रामविकास दृष्टिपथात येईल, असा आशावाद व्यक्त केला.

विदर्भात पिकणारा भाजीपाला, फळे व इतर शेतीमाल निर्यातीसाठी युनिव्हर्स एक्स्पोर्ट तत्पर असून कृषी विद्यापीठाच्या सहयोगातून येणाऱ्या काळात शेतीमाल निर्यातीत आघाडी घेत वैदर्भीय शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न करण्यासाठी कृषी पदवीधर निर्यातदार म्हणून आपल्या सेवा प्रदान करणार असल्याचे प्रतिपादन प्रवीण वानखडे यांनी केले.

डॉ. उंदीरवाडे यांनी विद्यापीठाच्या शेतकरीभिमुख विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी तीस टन उच्च गुणवत्तेच्या गांडूळ खत वाहतूक करणाऱ्या कंटेनरला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. तर मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्राचे प्राध्यापक डॉ. शिवाजी नागपुरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT