Mahesh Gaikwad
दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढतोच आहे. खते-बियाण्यांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी जेरीस आला आहे.
अधिक उत्पादनासाठी शेतीत बेसुमार रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खालावत चाललाय.
जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी शेतीमध्ये अधिकाधिक प्रमाणात सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे.
गांडूळ खत हे चांगल्या प्रतीचे उत्कृष्ठ सेंद्रीय खत आहे. सेंद्रीय शेतीसाठी गांडूळ खत वापरण्याचे अनेक फायदे आहेत.
शेतीत गांडूळ खतांचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. तसेच जमिनीती बाष्पीभवन कमी होते.
गांडूळ खतामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या भरपूर प्रमाणात वाढते. गांडूळे खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
गांडूळ खतांमुळे जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
गांडूळ खते वापल्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.जमिनीची धूप कमी होते.