Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay munde : कोणाची मागणी नव्हती म्हणून... सोयाबीन संशोधन केंद्रावर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Soybean Research Centre : परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन केंद्र व प्रक्रिया उपकेंद्र उभारणी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याला लातूर जिल्ह्यातून विरोध होत आहे.

Swapnil Shinde

Latur News : परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन केंद्र व प्रक्रिया उपकेंद्र उभारणी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात लातूरकर आक्रमक झाले असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात पळवल्याचा आरोप होत आहे. त्यावर शुक्रवारी लातूर दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लोदगा ता.औसा जि. लातूर येथील बांबू टिश्यू कल्चर लॅब व बांबू फर्निचर युनिटची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी आमदार पाशा पटेल उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले, या पूर्वी कधीही लातूरमध्ये संधोशन केंद्र करण्याची मागणी केली नव्हती. माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनी एका कार्यक्रमात लातूरमध्ये संशोधन केंद्र उभारण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. सोयाबीन हे मराठवाड्याचे महत्वाचे पीक आहे. मागास जिल्हा म्हणून असलेल्या बीड जिल्ह्यात आम्ही हे संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा लातूरच्या शेजारील जिल्ह्यात प्रकल्प उभारला जाणार आहे. तेथील संशोधनाचा उपयोग फक्त बीड होणार असे नाही. तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT