Azolla  Agrowon
ॲग्रो विशेष

Azolla Production Project : ॲझोला उत्पादन प्रकल्पास तज्ज्ञांची भेट

‘ॲझोला पशुधनासाठी उत्कृष्ट पूरक पोषण आहार निर्मिती प्रकल्प’ अकोले तालुक्यातील इंदोरी, उंचखडक, टाकळी, ढोकरी, वाशेरे, परखतपूर, खिरविरे, कोंभाळणे गावांमध्ये सुरू आहे.

Team Agrowon

Nagar News : अकोले तालुक्यातील (जि. नगर) विविध गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ॲझोला उत्पादन प्रकल्पास राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचिव डॉ. एन. जी. शहा, सदस्य डॉ. अरुण सप्रे, शास्त्रज्ञ डॉ. पराग दुपारे, त्याचबरोबर बाएफ संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी नुकतीच भेट दिली.

या वेळी या तज्ज्ञांनी ढोकरी गावातील शेतकऱ्यांकडून ॲझोला उत्पादन आणि वापराबाबत माहिती जाणून घेतली.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि बाएफ संस्थेच्या माध्यमातून ‘ॲझोला : पशुधनासाठी उत्कृष्ट पूरक पोषण आहार निर्मिती प्रकल्प’ अकोले तालुक्यातील इंदोरी, उंचखडक, टाकळी, ढोकरी, वाशेरे, परखतपूर, खिरविरे, कोंभाळणे गावांमध्ये सुरू आहे.

अकोले आणि संगमनेर तालुक्यात मागील तीन वर्षांमध्ये तीनशेहून अधिक पशुपालकांना या प्रकल्पाचा फायदा झाला आहे.

प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ॲझोला निर्मितीसाठी टाकी, कल्चर, उत्पादनाचे प्रशिक्षण, अभ्यास दौरा यासाठी सहकार्य करण्यात आले आहे.

प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांना बाएफ संस्थेतील तांत्रिक कार्यक्रम अधिकारी सदाशिव निंबाळकर आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी दीपक पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

प्रकल्प भेट कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन बाएफ संस्थेतील प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी, तर आभार प्रदर्शन रामनाथ नवले यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT