Lasalgaon APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon APMC : लासलगाव उपबाजाराच्या जमीन उपलब्धतेसाठी शासन सकारात्मक

Market Committee Expansion : चालू रेडीरेकनराचा दर भरून नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी व ‘ब’ सत्ताधारक समितीमध्ये बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

Team Agrowon

Nashik News : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारासाठी सुभाषनगर येथे ८ हेक्टर ६१.५६ आर, तर खानगाव नजीक येथील उपबाजारासाठी ३.५० हेक्टर जमीन बाजार समितीस उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच बाजार समितीला जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच लासलगाव येथील ‘ब’ सत्ताप्रकार मिळकती ‘क’ सत्ता प्रकारात नियमित करण्यास राज्य शासन सकारात्मक आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली.या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने समीर भुजबळ,महसूल विभागाचे सहसचिव, ‘ब’ सत्ता धारकांच्या वतीने शैलेश ठाकरे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, निफाड तहसीलदार, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे दूरदृष्य पद्धतीने बैठकीस उपस्थित होते.

चालू रेडीरेकनराचा दर भरून नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी व ‘ब’ सत्ताधारक समितीमध्ये बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिली.

लासलगांव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार विस्तारासाठी सुभाषनगर व खानगाव नजीक शिवारातील उपबाजार आवारासाठी जागा शासकीय दराने खरेदी तसेच लासलगाव येथील ‘ब’ सत्ताप्रकार मिळकती नियमित करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाबाबत छगन भुजबळ यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

बाजार समितीचा विस्तार होणे आवश्यक

महसूल विभागाच्या ३ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार नाममात्र १ रुपया कब्जेहक्काने रक्कम आकारून दिली जावी. बाजार समितीमध्ये होणारी उलाढाल बघता बाजार समितीचा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासनाने या प्रस्तावाला लवकर मंजुरी द्यावी शासनाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे यावेळी समीर भुजबळ यांनी सांगितले.

बाजार समितीच्या विस्तारासह सुविधा होणार उपलब्ध

शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे सुभाषनगर येथे कांदा निर्यात सुविधा केंद्र, तर खानगावनजीक येथे मिरची हब निर्माण होण्यास मदत होणार आहे. यामुळे आता लासलगाव बाजार समितीचा विस्तार अधिक वाढून शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीच्या सुविधा उपलब्ध होण्यासोबतच कांदा निर्यातीसाठी अधिक फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT