Election Agrowon
ॲग्रो विशेष

Election Management : दिव्यांग, आजारी शिक्षकांना निवडणूक सेवेतून वगळा

Teacher Problems on Election Work : निवडणूक काळात सेवेसंदर्भात शिक्षकांच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी शिक्षक समन्वय समितीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.

Team Agrowon

Akola News : निवडणूक काळात सेवेसंदर्भात शिक्षकांच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी शिक्षक समन्वय समितीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या समस्या, अडचणी व इतर बाबींचा निपटारा व्हावा व शिक्षकांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राजकारण विरहित अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

परंतु त्यानंतर सुद्धा याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याची ओरड शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे. दरम्यान शिक्षकांच्या विविध समस्यांसंदर्भात समितीने निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

अकोला जि.प. प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक देवानंद मोरे, मोहम्मद अझहर, श्रीकांत वानखडे, राजेश देशमुख, मारोती वरोकार, प्रमोद करणकार, दत्ता कोलटके, नागेश सरतकार, नागेश सोळंके व इतरांची उपस्थिती होती.

या आहेत मागण्या

दिव्यांग शिक्षक, दुर्धर आजारग्रस्त शिक्षक, महिला शिक्षिका व ज्येष्ठ शिक्षक यांचे लोकसभा निवडणूक ड्युटीचे आदेश रद्द करण्यात यावे. महिलांना स्थानिक स्तवरच ड्युटी देण्यात यावी, महिला केंद्राध्यक्षाचा आदेश रद्द करण्यात यावा. या संदर्भात शिक्षक संघटना समन्वय समितीने त्यांच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांना दिले.

डीसीपीएसमधून एनपीएसधारक शिक्षकांचा दरमहा पगारातील हिस्सा कपात झाला आहे. परंतु वित्त विभागाकडून प्राप्त आर्थिक विवरणपत्रामध्ये आणि कपात झालेल्या रकमेमध्ये फार मोठ्‍या प्रमाणात तफावत दिसून आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक अनियमितता झाली आहे, अशी संघटनेची धारणा आहे. याबाबत प्राधान्याने कार्यवाही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी सण अग्रीम व मार्च २०२४ चे वेतन देण्यात यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Rate: केळी दर निश्‍चिती बाबतप्रशासनाची चालढकल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील

Gokul Dairy Products: ‘गोकुळ’ आइस्क्रीम, बटर बाजारात आणणार

Government Decision: कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपच देणार

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT